महाबुलेटीन न्यूज नेटवर्क
पुणे, दि. 13 ( जि. मा. का. ) : पुणे जिल्हयातील ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक प्रक्रियेदरम्यान मतदान केंद्राच्या परिसरात कायदा व सार्वजनिक सुव्यवस्था राखण्यासाठी दिनांक 15 जानेवारी 2021 रोजी मतदानाचे दिवशी शिरुर, वेल्हा, आंबेगाव, जुन्नर, दौंड, इंदापूर व बारामती तालुक्यातील आठवडे बाजार भरविण्याबाबत मनाई आदेश जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिले आहेत.
शिरुर तालुक्यातील मांडवगण फराटा, पाबळ, वेल्हा तालुक्यातील वेल्हे बु., आंबेगाव तालुक्यातील घोडेगाव, जुन्नर तालुक्यातील आळे, निमगांव सावा, दौंड तालुक्यातील यवत, इंदापूर तालुक्यातील रुई व निरगुडे तसेच बारामती तालुक्यातील सांगवी गावामधील आठवडे बाजार भरविण्यास मनाई करण्यात आली आहे. त्यापुढील शुक्रवार दिनांक 22 जानेवारी 2021 पासून आठवडे बाजार पूर्ववत भरविण्यात यावेत, असेही आदेशाद्वारे कळविण्यात आले आहे.
शनिवार, २१ मार्च २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ पुणे-नाशिक…
शुक्रवार, २० मार्च २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 महिला…
गुरुवार, १९ मार्च २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 भीषण…
बुधवार, १८ मार्च २०२६ 📍 महाराष्ट्र आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🏛️ पुणे जिल्हा परिषद…
मंगळवार, १७ मार्च २०२६ 📍 महाराष्ट्र आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकणमध्ये भटक्या कुत्र्यांचा…
पुणे जिल्ह्यात भटक्या कुत्र्यांचा वाढता धोका पुन्हा एकदा समोर आला आहे, चाकण येथे एका 32…
This website uses cookies.