महाबुलेटीन न्यूज । अर्जुन मेदनकर
आळंदी : खेड तालुक्यातील गोलेगाव-पिंपळगाव संयुक्त ग्रामपंचायत सरपंचपदी कु. अमित रामदास चौधरी यांची बिनविरोध निवड झाल्याचे पीठासीन अधिकारी तथा आळंदी मंडलाधिकारी स्मिता जोशी यांनी जाहीर केले.
गोलेगाव पिंपळगाव ग्रामपंचायत सरपंच अश्विनी चौधरी यांनी आपले पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या सरपंच पदासाठी सदस्यांची विशेष सभा झाली. या सभेत सरपंच पदासाठी कु. अमित रामदास चौधरी यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी स्मिता जोशी यांनी सांगितले.
यावेळी मावळत्या सरपंच अश्विनी चौधरी, उपसरपंच निलम चौधरी, सदस्य निर्मला शिंदे, बेबीताई चौधरी, पल्लवीताई चौधरी, मयूर शिंदे, दिलीप चौधरी, नानासाहेब चौधरी सदस्य उपस्थित होते. पहिल्यांदाच ग्रामपंचायत सरपंच पदावर कुमार व सर्वात कमी वयाचे कु. अमित चौधरी यांची निवड झाली. या निमित्त खेड पंचायत समितीचे सभापती अरुणशेठ चौधरी, सामाजिक कार्यकर्ते पै. बाळासाहेब चौधरी, माजी चेअरमन कुंडलिक चौधरी, उद्योजक प्रवीण चौधरी आदींचे हस्ते सत्कार करून पुढील कामकाजासाठी मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या. युवक तरुणांनी निवडीचे स्वागत केले.
यावेळी पंचायत समिती सभापती अरुण चौधरी म्हणाले, “गोलेगाव-पिंपळगाव मधील विविध विकास कामे पंचायत समिती कडील विविध योजना देवून मार्गी लावली असून अधिकचा विकास या पुढील काळात समाजोपयोगी कामे करून ग्रामस्थांच्या अपेक्षा पूर्ण केल्या जातील”, अशी ग्वाही दिली.
यावेळी नवनिर्वाचित सरपंच अमित चौधरी म्हणाले, “माझ्यावर ग्रुप ग्रामपंचायतने दिलेली जबाबदारी व ठेवलेला विश्वास सार्थ होण्यासाठी प्रयत्नशील राहील. यापुढील काळात अधिकचा वेळ देवून गावातील विकास कामांना प्राधान्य देणार.”
००००
महाबुलेटीन न्यूज l किशोर कराळे मुंबई, दि. ७: पुणे-नाशिक आणि नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गांवर मोठ्या प्रमाणात…
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर पुणे : हडपसर ते यवत आणि तळेगाव-चाकण शिक्रापूर महामार्गाच्या रुंदीकरणासाठी…
महाबुलेटीन न्यूज महाळुंगे ( चाकण एमआयडीसी ) : एक वर्षापासुन पाहीजे असलेल्या आरोपी कडुन १…
महाबुलेटीन न्यूज | आनंद कांबळे जुन्नर : पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील दुर्गावाडी परिसरात एक धक्कादायक…
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर चाकण ( पुणे ) : महाराष्ट्र हे उद्योगांना प्रोत्साहन देणारे…
महाबुलेटीन न्यूज | राजगुरूनगर खेड कृषी उत्पन्न बाजार समिती सेवानिवृत्त सचिव सतीश चांभारे यांची खेड…
This website uses cookies.