शैक्षणिक

घोडेगाव प्रकल्पातील १९ आश्रमशाळांचा दहावीचा निकाल १०० टक्के

महाबुलेटीन नेटवर्क / अविनाश घोलप
घोडेगाव : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय घोडेगाव ( ता. आंबेगाव ) अंतर्गत असलेल्या २२ शासकीय व ९ अनुदानित आश्रमशाळांपैकी १९ आश्रमशाळांचा इयत्ता दहावीचा निकाल शंभर टक्के लागला असल्याची माहिती प्रकल्प अधिकारी आर. बी. पंढुरे यांनी दिली.
शंभर टक्के निकाल लागलेल्या आश्रमशाळा पुढीलप्रमाणे :-
शासकीय आश्रमशाळा गोहे बुद्रुक, शासकीय आश्रमशाळा तेरुंगण, शासकीय आश्रमशाळा असाणे, शासकीय आश्रमशाळा आहुपे, शासकीय इंग्लिश मीडियम आश्रमशाळा घोडेगाव, शासकीय आश्रमशाळा सोमतवाडी, शासकीय आश्रमशाळा खिरेश्वर, शासकीय आश्रमशाळा अंजनावळे, शासकीय आश्रमशाळा सोनावळे, शासकीय आश्रमशाळा मुथाळणे, शासकीय आश्रमशाळा वडेश्वर, शासकीय आश्रमशाळा कोहिंडे, शासकीय आश्रमशाळा कुरुंजी, शासकीय आश्रमशाळा पांगारी, शासकीय आश्रमशाळा गोगवे, शासकीय आश्रमशाळा कोते, शासकीय आश्रमशाळा बामणोली, शासकीय आश्रमशाळा बोरबेट तसेच अनुदानित आश्रमशाळा कामशेत या १९ आश्रमशाळांचा निकाल १०० टक्के लागला आहे.
इतर आश्रमशाळांचा निकाल व टक्केवारी पुढीलप्रमाणे –
शासकीय आश्रमशाळा टोकावडे – ९३.९२ टक्के, शासकीय आश्रमशाळा चिखलगाव – ९६.८८ टक्के, शासकीय आश्रमशाळा खटकाळे – ९३.७५ टक्के, शासकीय आश्रमशाळा राजपूर – ९४.५१ टक्के तसेच अनुदानित आश्रमशाळा ओतूर – ८५.३६ टक्के, अनुदानित आश्रमशाळा आलमे – ८९.४७ टक्के, अनुदानित आश्रमशाळा चावंड – ९३.८७ टक्के, अनुदानित आश्रमशाळा तळेरान – ९७.३७ टक्के, अनुदानित आश्रमशाळा कोळवाडी – ९७.४३ टक्के, अनुदानित आश्रमशाळा माळेगाव – ९५.६५ टक्के, अनुदानित आश्रमशाळा फुलवडे – ९३.९३ टक्के, अनुदानित आश्रमशाळा चिंचवडगाव – ८८.८८ टक्के.
यशस्वी विद्यार्थ्यांचे, मार्गदर्शक शिक्षकांचे व मुख्याध्यापकांचे प्रकल्प अधिकारी आर. बी. पंढुरे, सहाय्यक प्रकल्प अधिकारी दीपक कालेकर, सहाय्यक प्रकल्प अधिकारी ( शिक्षण ) नवनाथ भवारी, कार्यालयीन अधीक्षक शरद काळे यांनी अभिनंदन केले.
admin

Recent Posts

MahaBulletin — 17 May 2026

शनिवार, १६ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 पिंपरी…

3 weeks ago

MahaBulletin — 13 May 2026

रविवार, १० मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🐾 चाकण…

4 weeks ago

MahaBulletin — 10 May 2026

शनिवार, ९ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 वृद्धेचा…

4 weeks ago

MahaBulletin — 09 May 2026

शुक्रवार, ८ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🐾 बिबट्याची…

4 weeks ago

MahaBulletin — 07 May 2026

बुधवार, ६ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 एमआयडीसीतील…

1 month ago

MahaBulletin — 06 May 2026

मंगळवार, ५ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 बालकावर…

1 month ago

This website uses cookies.