महाबुलेटीन न्यूज : आनंद कांबळे
जुन्नर : “हवेचे व पाण्याचे प्रदूषण रोखण्यासाठी महिलांनी घरगुती ओल्या कचऱ्या पासून खतनिर्मिती करावी. आजच्या काळात पर्यावरणाचे संवर्धन व संरक्षण करण्याची जबाबदारी स्थानिक स्वराज्य संस्थांबरोबर समाजातील प्रत्येक घटकाची आहे.”असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. चंद्रकांत मंडलिक यांनी केले.
जुन्नर येथील श्री शिव छत्रपती कॉलेजचे प्राचार्य डॉ. चंद्रकांत मंडलिक यांच्या घरातील परस बागेत घरगुती कचऱ्या पासून खत निर्मिती कशी करावी याची कार्यशाळा घेण्यात आली, यावेळी ते मार्गदर्शन करताना बोलत होते.
‘माझी वसुंधरा’ अभियाना अंतर्गत जुन्नर नगरपालिकेने आयोजीत केलेल्या या कार्यशाळेत ५० महिलांनी सहभाग घेतला. या प्रसंगी सौ. विजया चंद्रकांत मंडलिक यांनी प्रात्यक्षिकाद्वारे झाडांचा पाला-पाचोळा, घरातील पालेभाज्यांचा कचरा, फळांच्या साली, माती व शेणखत इत्यादींचा वापर करून आपण सेंद्रिय खत कसे तयार करावे याबाबत महिलांना मार्गदर्शन केले. मानवाचे व प्राण्यांचे आरोग्य चांगले राहावे, यासाठी जुन्नर नगरपालिका विविध उपक्रमांमार्फत माहिती देत आहे.
स्वच्छता अभियानात जुन्नर शहराने प्रथम क्रमांक मिळवला असून याही उपक्रमात अग्रभागी राहण्यासाठी मुख्याधिकारी मच्छिंद्र घोलप व नगराध्यक्ष श्याम पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पालिका कर्मचारी घरोघरी जाऊन ओल्या कचऱ्यापासून सेंद्रिय खत निर्माण करण्याचे प्रशिक्षण महिलांना देत आहेत.
या कार्यशाळेचे प्रस्ताविक सौ. दिप्ती कुलकर्णी यांनी केले. चित्रा आवटे यांनी ‘माझी वसुंधरा’- हरितची महिलांना शपथ दिली. शहर अभियंता सौ. शिल्पा निंबाळकर, आरोग्य अधिकारी प्रशांत खत्री, नोडल अधिकारी राहुल गोरे, स्वप्नील जावळे व प्रकाश चव्हाण यांनी कार्यशाळेचे आयोजन केले. संगणक अधिकारी संदीप इंगोले यांनी सूत्र संचालन केले.
—
सोमवार, ८ जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 गुन्हेगारीवर…
रविवार, ७ जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 खेडमध्ये…
शनिवार, १६ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 पिंपरी…
रविवार, १० मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🐾 चाकण…
शनिवार, ९ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 वृद्धेचा…
शुक्रवार, ८ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🐾 बिबट्याची…
This website uses cookies.