महाबुलेटीन न्यूज । सुनील जगताप
उरुळी कांचन (ता. हवेली) येथील स्मशानभूमी प्रवेशद्वारावर संत तुकाराम महाराजांच्या वैकुंठ गमनाचे शिल्प साकारण्यात आले आहे. त्याचा लोकार्पण सोहळा पंचक्रोशी प्रासादिक दिंडीचे अध्यक्ष रामभाऊ दौंडकर व माऊली तांबे यांच्या हस्ते गुरुवारी (ता. २९ जुलै ) करण्यात आले.
उरुळी कांचन येथील दानशूर कुटुंब आबासाहेब पाटीलबुवा कांचन, उद्योजक संजय आबासाहेब कांचन व जिल्हा नियोजन समितीचे सदस्य संतोष आबासाहेब कांचन यांच्यावतीने उरुळी कांचन भजनी मंडळाच्या आग्रहास्तव सुमारे अडीच लाख रुपये खर्च करून गावच्या स्मशानभूमी प्रवेशद्वारावर संत तुकाराम महाराजांच्या वैकुंठ गमनाचे शिल्प साकारण्यात आले आहे.
संत तुकाराम महाराजांचे सदेह वैकुंठ गमनाच्या अनुभूतीमधून प्रेरणा मिळावी, हा उद्देश असल्याने हे शिल्प साकारण्यात आल्याची माहिती जिल्हा नियोजन समितीचे सदस्य संतोष कांचन यांनी दिली. तसेच या शिल्पाची उत्कृष्ठ निर्मिती उरुळी कांचन येथील गणेश कुंभार यांनी केली आहे. यावेळी उरुळी कांचनचे सरपंच संतोष हरिभाऊ कांचन, उपसरपंच संचिता संतोष कांचन, माजी सरपंच दत्तात्रय कांचन, माजी जि.प. सदस्य महादेव कांचन, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक राजाराम कांचन, तंटामुक्ती अध्यक्ष अमित कांचन, ग्रामविकास अधिकारी यशवंत डोळस, ह. भ. प. सुरेश कांचन, दीपक कांचन, विनोद कांचन, महादेव (नाना) कांचन, हरिभाऊ डोलारे, घनश्याम जाधव, राजू खेडेकर व ग्रामपंचायत सदस्य आदी मान्यवर उपस्थित होते.
००००
महाबुलेटीन न्यूज l किशोर कराळे मुंबई, दि. ७: पुणे-नाशिक आणि नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गांवर मोठ्या प्रमाणात…
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर पुणे : हडपसर ते यवत आणि तळेगाव-चाकण शिक्रापूर महामार्गाच्या रुंदीकरणासाठी…
महाबुलेटीन न्यूज महाळुंगे ( चाकण एमआयडीसी ) : एक वर्षापासुन पाहीजे असलेल्या आरोपी कडुन १…
महाबुलेटीन न्यूज | आनंद कांबळे जुन्नर : पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील दुर्गावाडी परिसरात एक धक्कादायक…
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर चाकण ( पुणे ) : महाराष्ट्र हे उद्योगांना प्रोत्साहन देणारे…
महाबुलेटीन न्यूज | राजगुरूनगर खेड कृषी उत्पन्न बाजार समिती सेवानिवृत्त सचिव सतीश चांभारे यांची खेड…
This website uses cookies.