महाबुलेटीन न्यूज : प्रतिनिधी
चाकण : आली गौराई आली, सोन पावली आली, म्हणत पारंपरिक पद्धतीने घराघरांमध्ये गौरीचे आगमन झाले. हा सण उत्साहात महिला वर्ग साजरा करतात. या वर्षी कोरोनाच्या प्रादुर्भावात देखील मोठ्या उत्साहात हा सण साजरा झाला. लक्ष्मी आली धन्याच्या पावली, लेकरा बाळाच्या पावली, घरच्या लक्ष्मीच्या पावली, गाई वासरांच्या पावली म्हणत गौरीचे आगमन झाले.
खेड तालुका काँग्रेस आयच्या अध्यक्षा व महाराष्ट्र युथ ऑर्गनाझेशन खेड तालुका उपाध्यक्षा ॲड. जयाताई बाळासाहेब मोरे यांच्या घरी मोठ्या उत्साहात गौरी आगमन झाले. कोरोणाच्या पार्श्वभूमीवर कोरोना योद्धा हा देखावा त्यांनी साकारला. या मध्ये एका गौरीला डॉक्टर व एका गौरीला पोलीस बनवून त्यांनी डॉक्टर व पोलिस यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त केली. त्यांनी कोविड सेंटर, रुग्णालय, पोलीस ठाणे, रुग्णवाहिका आदी पुटठ्या पासून बनवून इकोफ्रेंडली देखावा सादर केला. तसेच मास्क लावा, गर्दी टाळा, सुरक्षित अंतर ठेवा, नियमांचे पालन करा, हात स्वच्छ धुवा असे फलक लावून जनजागृती केली. या वर्षी कोरोनाचे संकट लवकर दूर होऊदे अशी गौरीला त्यांनी प्रार्थना केली.
महाबुलेटीन न्यूज l किशोर कराळे मुंबई, दि. ७: पुणे-नाशिक आणि नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गांवर मोठ्या प्रमाणात…
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर पुणे : हडपसर ते यवत आणि तळेगाव-चाकण शिक्रापूर महामार्गाच्या रुंदीकरणासाठी…
महाबुलेटीन न्यूज महाळुंगे ( चाकण एमआयडीसी ) : एक वर्षापासुन पाहीजे असलेल्या आरोपी कडुन १…
महाबुलेटीन न्यूज | आनंद कांबळे जुन्नर : पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील दुर्गावाडी परिसरात एक धक्कादायक…
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर चाकण ( पुणे ) : महाराष्ट्र हे उद्योगांना प्रोत्साहन देणारे…
महाबुलेटीन न्यूज | राजगुरूनगर खेड कृषी उत्पन्न बाजार समिती सेवानिवृत्त सचिव सतीश चांभारे यांची खेड…
This website uses cookies.