या संदर्भात सतीश दरेकर म्हणाले की, “महाराष्ट्र शासनाचे गृह विभागाचे प्रधान सचिव ( विशेष ) अमिताभ गुप्ता यांनी 11 जुलै 2020 रोजी आदेश क्र. – आरएलपी- 0620/प्र.क्रं.90/विशा 1 परित केला आहे. त्यातील क्र. तीनच्या मुद्यामध्ये गणेश मुर्तीच्या उंचीबाबतचे आदेश दिले आहेत. राज्य शासनाच्या या आदेशाला उशीर झाला आहे. ऑगस्ट महिन्यात गणेशोत्सव असल्याने कुंभार समाज उत्सवाच्या आधी आठ ते दहा महिने मुर्ती तयार करण्याचे काम करत असतात. यासाठी मुर्तीकार मोठ्या प्रमाणात कर्जे घेत असतात. सद्य स्थितीत कोरोनामुळे कुंभार समाज आधिच मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. शासनाच्या गणेश मुर्तींच्या या आदेशामुळे तयार केलेल्या मुर्ती विकल्या जाणार नाहीत व राज्यातील कुंभार समाज मोठ्या अर्थिक संकटात सापडून पूर्णतः उध्वस्त होईल, यामुळे या मार्गदर्शक सुचना निर्णयातील क्र. तीनच्या मुद्याचा शासनाने फेरविचार करावा व क्र. 3 ची अंमलबजावणी या वर्षी करु नये”, अशी विनंती शासनाला केली आहे.
रविवार, २६ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 काळुस…
शनिवार, २५ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 राजकीय…
शुक्रवार, २४ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…
गुरुवार, २३ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 आरटीई…
मंगळवार, २१ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🌾 निवृत्त…
सोमवार, २० एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 सिद्धेश्वर…
This website uses cookies.