महाबुलेटीन न्यूज : अविनाश घोलप
मंचर : आदर्शगाव गावडेवाडी ( ता. आंबेगाव ) येथील कै. निवृत्ती महाराज गायकवाड यांचा दशक्रिया विधीचे औचित्य साधत गायकवाड कुटुंबीयांनी वृक्षारोपण तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मास्क, सॅनिटायझर, अर्सेनिक अल्बम ३० आदींचे वाटप करून दशक्रिया विधी पार पाडला.
कोरोनाच्या काळात ऑक्सिजन किती महत्त्वाचा आहे, हे आपल्याला पटले आहे. त्यामुळे दशक्रिया विधीच्या निमित्ताने असे वृक्षलागवडीसारखे तसेच कोरोना जनजागृती बाबतचे उपक्रम राबवले गेले पाहिजेत, असे मत अनेक नामवंतांनी याप्रसंगी व्यक्त केले. गावातील वारकरी संप्रदायाचे कीर्तनकार निवृत्ती महाराज गायकवाड यांचे गेल्या आठवड्यात निधन झाले.
रविवारी त्यांच्या दशक्रिया विधीच्या निमित्ताने गायकवाड कुटुंबीय तसेेेह गावकऱ्यांनी वड, पिंपळ, चिंच, जांभूळ, कवठ, फणस आदी पर्यावरणपूरक २०० हून अधिक झाडे लावण्याचा उपक्रम राबविला. त्याचप्रमाणे दशक्रियेचा अनावश्यक खर्च टाळून उपस्थितांना आई-नाना प्रतिष्ठान तर्फे मास्क, सॅनिटायझर, अर्सेनिक अल्बम-३० आदींचे वाटप करण्यात आले. गावडेवाडी येथील हिरकणी विद्यालयाला पुस्तके भेट देण्यात आली.
ह. भ. प. श्यामसुंदर महाराज सोन्नर यांचे यावेळी प्रवचन झाले. उपस्थित अनेक मान्यवरांनी आपल्या भावना श्रद्धांजलीतुन व्यक्त केल्या. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व नियमांचे पालन करण्यात आले होते. याप्रसंगी सूत्रसंचालन माजी सरपंच देवराम गावडे यांनी केले.
महाबुलेटीन न्यूज l किशोर कराळे मुंबई, दि. ७: पुणे-नाशिक आणि नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गांवर मोठ्या प्रमाणात…
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर पुणे : हडपसर ते यवत आणि तळेगाव-चाकण शिक्रापूर महामार्गाच्या रुंदीकरणासाठी…
महाबुलेटीन न्यूज महाळुंगे ( चाकण एमआयडीसी ) : एक वर्षापासुन पाहीजे असलेल्या आरोपी कडुन १…
महाबुलेटीन न्यूज | आनंद कांबळे जुन्नर : पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील दुर्गावाडी परिसरात एक धक्कादायक…
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर चाकण ( पुणे ) : महाराष्ट्र हे उद्योगांना प्रोत्साहन देणारे…
महाबुलेटीन न्यूज | राजगुरूनगर खेड कृषी उत्पन्न बाजार समिती सेवानिवृत्त सचिव सतीश चांभारे यांची खेड…
This website uses cookies.