गुन्हेगारी

फरार आरोपी अखेर पोलिसांच्या ताब्यात

महाबुलेटीन नेटवर्क / प्रतिनिधी
बारामती : बारामती तालुका पोलीस स्टेशनमध्ये एका अज्ञात व्यक्तीने बुलेट गाडी चोरून नेल्याची फिर्याद दाखल करण्यात आली होती. सुरेश बचाराम बिबे ( रा. शिर्सुफळ, ता. बारामती जि. पुणे ) यांनी गाडी चोरीला गेल्याची फिर्याद दाखल केली होती.
सदर दाखल करण्यात आलेल्या फिर्यादीनुसार, गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश लंगुटे व त्यांच्या पथकाने मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे चोरीला गेलेली बुलेट गाडी क्रमांक ( एम.एच १६ बी.जी.  ४८४८ ) आरोपी रोहित अजित भंडलकर ( रा. लक्ष्मीनगर, फलटण, जि. सातारा ) याच्याकडून हस्तगत केली असून, त्यास आरोपीस अटक करण्यात आली आहे. सदर आरोपीवर यापूर्वीचे अनेक गुन्हे बारामती तालुका पोलीस ठाण्यात दाखल आहेत. तसेच बारामती शहर पोलीस ठाण्यात पोक्सो, ॲट्रॉसिटीसह विविध गुन्हें दाखल असून तो गेल्या पाच महिन्यापासून फरार होता.
सदरची कामगिरी बारामती तालुका पोलीस निरीक्षक आण्णासाहेब घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोधपथकाचे सपोनि लंगुटे, पोलीस हवालदार दत्ता कुंभार, पोलीस कॉन्स्टेबल नंदू जाधव, विनोद लोखंडे यांनी केली आहे.
admin

Recent Posts

MahaBulletin — 26 Jul 2026

शनिवार, २५ जुलै २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 💧 खेडमध्ये…

7 hours ago

MahaBulletin — 23 Jul 2026

बुधवार, २२ जुलै २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 5 बातम्या 💧 अतिवृष्टी…

3 days ago

MahaBulletin — 20 Jul 2026

रविवार, १९ जुलै २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ पुरंदर…

6 days ago

MahaBulletin — 18 Jul 2026

शुक्रवार, १७ जुलै २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ तीन…

1 week ago

MahaBulletin — 17 Jul 2026

बुधवार, १५ जुलै २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 खेड…

1 week ago

MahaBulletin — 14 Jul 2026

सोमवार, १३ जुलै २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 पंढरीच्या…

2 weeks ago

This website uses cookies.