महाबुलेटीन न्यूज
पुणे : आपल्या कलानैपुण्याने समाजातील दुःखी जनांच्या आणि विविध आजारांनी ग्रस्त रूग्णांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवून त्यांच्या जीवनात आनंदाचे क्षण पेरणारे प्रसिद्ध हास्यकलावंत, एकपात्री कलाकार आणि सिनेअभिनेते संतोष चोरडिया यांचा मनोरंजनाव्दारे ३३ वर्षे सामाजिक सेवा करीत असल्याबद्दल विदिशा विचार मंचतर्फे बुधवार दिनांक १ फेब्रुवारी २०२३ रोजी विशेष गौरव करण्यात येणार आहे.
ज्येष्ठ समाजसेवक आणि अहमदनगर येथील स्नेहालय संस्थेचे संस्थापक-अध्यक्ष डॉ. गिरीश कुलकर्णी यांच्या हस्ते सकाळी ११ वाजता, दुसरा मजला, पत्रकार भवन, गांजवे चौक, नवी पेठ, पुणे येथे हा सत्कार सोहळा होणार आहे.
यानिमित्त संतोष चोरडिया यांचा विविध माध्यमांमधील कलाप्रवास आणि मनोरंजनाव्दारे समाजसेवा करण्याचा ध्यास त्यांच्या प्रकट मुलाखतीव्दारे जाणून घेता येणार असून त्यांच्याशी विदिशा विचार मंचच्या संस्थापक-संचालक ममता क्षेमकल्याणी संवाद साधणार आहेत. हा कार्यक्रम सर्व रसिकांसाठी खुला असून यावेळी उपस्थित राहण्याचे आवाहन विदिशा विचार मंचतर्फे करण्यात आले आहे.
गुरुवार, ३ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…
मंगळवार, १ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ कुकडी…
सोमवार, ३१ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 राजगुरुनगरमध्ये…
रविवार, ३० ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 अपघातांची…
शुक्रवार, २८ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 5 बातम्या 📰 चाकणमध्ये…
बुधवार, २६ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ चाकण…
This website uses cookies.