महाबुलेटीन न्यूज
महाळुंगे ( चाकण एमआयडीसी ) : एक वर्षापासुन पाहीजे असलेल्या आरोपी कडुन १ गावठी पिस्तुल व ०२ जिवंत काडतुसे हस्तगत करून अटक करण्यात आली असल्याची माहिती पिंपरी चिंचवड पोलीस उपायुक्त संदीप डोईफोडे यांनी दिली.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी कि, दि.१७/०६/२०२५ रोजी म्हाळुंगे एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीत गुन्हे शाखा युनिट ३ कडील पोलीस उपनिरीक्षक सुनिल जावळे, पोलीस हवालदार यदु आढारी, सोनवणे, मेरगळ, जैनक, बाळसराफ असे अभिलेखावरील पाहीजे आरोपींचा शोध घेत असताना वरील पथकास मिळालेल्या गुप्त बातमीनुसार, म्हाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाणे गु.र.नं. ६५६/२०२४ भा. दं. वि. कलम ३२४ या गुन्हयामधील गेले एक वर्षापासुन पाहीजे असलेला आरोपी नामे शुभम सोमेश्वर मुंगडे ( वय २० वर्षे, रा. कडाचीवाडी, ता. खेड, जि. पुणे, मुळ रा. तडखेल, ता. देगलुर, जि. नांदेड ) यास निघोजे येथून ताब्यात घेतले. त्याचे अंगझडती मध्ये १ गावठी पिस्तुल व २ जिवंत काडतुसे मिळून आली.
सदर आरोपी विरुध्द पोलीस शिपाई रामदास यशवंत मेरगळ यांनी म्हाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाणे गु.र.नं. ३८४/२०२५ भारतीय शस्त्र अधिनियम कलम ३ (२५), महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७ (१) (३) सह कलम १३५ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
सदरची कारवाई पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, अपर पोलीस आयुक्त सारंग आवाड, पोलीस उपआयुक्त (गुन्हे) संदिप डोईफोडे, सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) डॉ. विशाल हिरे यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र कदम, पोलीस उपनिरीक्षक सुनिल जावळे, पोलीस हवालदार आढारी, सोनवणे, मोरे, मेरगळ, जैनक, बाळसराफ, काळे, नागेश माळी यांनी केली आहे.
महाबुलेटीन न्यूज | आनंद कांबळे जुन्नर : पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील दुर्गावाडी परिसरात एक धक्कादायक…
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर चाकण ( पुणे ) : महाराष्ट्र हे उद्योगांना प्रोत्साहन देणारे…
महाबुलेटीन न्यूज | राजगुरूनगर खेड कृषी उत्पन्न बाजार समिती सेवानिवृत्त सचिव सतीश चांभारे यांची खेड…
महाबुलेटीन न्यूज l प्रसन्नकुमार देवकर चाकण : युगंधर पब्लिकेशन हाऊस, महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा चाकण,…
महाबुलेटीन न्यूज l प्रसन्नकुमार देवकर पुणे, दि.१६ : पालखी सोहळ्यात वारकऱ्यांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून…
महाबुलेटीन न्यूज चाकण : चाकण जवळील मेदनकरवाडी येथील बालाजीनगरमध्ये १३ मे रोजी कामगार महिलेवर झालेल्या…
This website uses cookies.