संपादकीय

‘लाख’ मोलाचे….!

विचार, कृती आणि निकाल या क्रमाने गोष्टी घडतात. अर्थात मार्गावर खाचखळगे असतात. अडथळे असतात. त्या अनुषंगाने मग धडपडणे ओघाने आलेच. टीका आणि कौतुक हेही त्या प्रक्रियेचा भाग. अशीच साधारणपणे वाटचाल ‘महाबुलेटिन’ ची राहिली.
       जेमतेम महिना झाला. महाबुलेटिनची सुरुवात झाली. मग मित्र जोडीला उभे राहू लागले. काही प्रत्यक्ष तर काही अप्रत्यक्ष. जणू संघ तयार झाला. म्हणूनच महाबुलेटिन एक टीम तयार झाली. या टीमची सांघिक कामगिरी समोर येऊ लागली. महिनाभरात ‘लाख’भर लोकांपर्यंत पोहचणे, हे या सांघिक कामगिरीचे यश आहे. हे लाख मोलाचे आशीर्वाद महाबुलेटिन टीमसाठी आहेत. हे हुरूप वाढवणारे व ऊर्जा देणारे आहे.
       महिन्याचा मागोवा घेताना ‘लाख’ लोकांनी महाबुलेटिनला पाहिले. अभ्यासले. यातील प्रयोग, बातम्या यासंदर्भात हितचिंतकांनी संपर्क करून कौतुक केले. काहींनी सूचना केल्या. काही मित्रांनी कधीकधी आपसात टीकाही केली.  या सर्व गोष्टी महाबुलेटिन या लोकाभिमुख व लोकांच्या व्यासपीठाला आवश्यकही होते. त्यामुळे सर्वांचेच आभार व्यक्त करणे महाबुलेटिन टीमचे कर्तव्य आहे.
       ब्रेकिंग, जलद, सर्वात पुढे वगैरे महाबुलेटिनसाठी कधीच महत्वाचे नाही. विश्वासार्ह बातम्या, बातम्यांमधील वेगळेपण, मोजकेपणाने मांडणी, बातम्या/ सदर यातील दर्जा यासाठी महाबुलेटिन टीम आग्रही आहे. पत्रकारतेतील दर्जा आणि विश्वास  यासाठी महाबुलेटिन टीम कार्यरत आहे. महिन्याभरातील लाख मोलाच्या पाठिंब्यावर आणि सूचना या शिदोरीवर महाबुलेटिन टीम कार्यरत राहील. लाखांचा आकडा आमच्यासाठी मोलाचा आणि ऊर्जा देणारा आहे.  यापुढेही सूचनांचे स्वागत आहे. आशीर्वाद देणाऱ्या हितचिंतकांचे ऋण आणि टीका करणाऱ्यांचे महाबुलेटिन टीमकडून आभार. पुढे जाताना महिनाभराचे काम व प्रवास याचे सिंहावलोकन करताना केलेला हा शब्द प्रपंच.
admin

Share
Published by
admin

Recent Posts

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक शिधावाटप दुकानदारांच्या कमिशनमध्ये प्रतिक्विंटल 20 रुपये वाढ करण्याचा निर्णय केंद्राची मान्यता आणि नाफेड यंत्रणेमार्फत उपलब्ध होणाऱ्या 10 वस्तूंची विक्री शिधावाटप दूकानातून करण्यास परवानगी – उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत निर्णय प्रत्येक विधानसभा मतदारसंघात किमान एक कार्यालय असावे, अशा पद्धतीने मुंबई, ठाण्यातील शिधावाटप यंत्रणेची पुनर्रचना – उपमुख्यमंत्री तथा अन्न व नागरी पुरवठामंत्री अजित पवार

महाबुलेटीन न्यूज | किशोर कराळे मुंबई, दि. 15 : राज्याच्या खेडोपाड्यातील 7 कोटी लाभार्थ्यांना धान्यवाटप…

4 days ago

व्याजाच्या पैशांच्या वादातून हत्या..! बारामती-सोरटेवाडी हत्या प्रकरणातील आरोपीला चाकण पोलिसांनी केलं जेरबंद

महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर चाकण : बारामती तालुक्यातील सोरटेवाडी येथील हत्या प्रकरणातील आरोपीला पिंपरी-चिंचवड…

2 weeks ago

पत्रकारांनो सावधान.. तुम्हाला 250 कोटींचा दंड होऊ शकतो

मुंबई : "विशेष जनसुरक्षा कायद्याचा" बडगा राज्य सरकार महाराष्ट्रातील पत्रकार आणि जनतेवर उगारू पहात आहे.…

3 weeks ago

महिलांना व्यवसायासाठी मिळणार 3 लाख रुपये बिनव्याजी कर्ज! येथे अर्ज करा Small Business Loan Apply

महाबुलेटीन न्यूज | Mahabulletin News Small Business Loan : खास महिलांसाठी केंद्र शासनाकडून नवीन उद्योगिनी…

4 weeks ago

दुबईत खेडच्या मराठी तरुणाची व्यवसायात भरारी…

महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर पुणे जिल्ह्यातील राजगुरूनगरच्या साईनाथ मांजरे या मराठी तरुणाने ट्रॅव्हलसचा व्यवसाय…

4 weeks ago

This website uses cookies.