अध्यात्मिक

ज्ञानेश्वर महाराज थोरल्या पादुका मंदिरात अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता

आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : पुणे आळंदी या पालखी मार्गावरील वडमुखवाडी येथील श्री संत ज्ञानेश्वर महाराज थोरल्या पादुका मंदिरात श्रीगुरू निवृत्तींनाथ महाराज त्र्यंबकेश्वर यात्रा व श्री संत ज्ञानेश्वर माऊली व श्री विठ्ठल रुक्मिणी मूर्ति प्राणप्रतिष्ठापना वर्धापन दिना निमित्त अखंड हरिनाम सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यापक मारुती महाराज कुरेकर,नरहरी महाराज चौधरी, उद्योजक विजय जगताप, संजय भिसे, माजी नगरसेवक अप्पा बागल, सुरेश भोईर यांचे हस्ते श्री ज्ञानेश्वरी पूजन, गाथा व विना पूजन करण्यात आले. यावेळी श्री संत ज्ञानेश्वर महाराज थोरल्या पादुका मंदिर देवस्थांन ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष ॲड. विष्णू तापकीर, खजिनदार दत्तात्रय गायकवाड, रमेश महाराज घोगडें, मनोहर भोसले, राजेंद्र नाणेकर यांचे हस्ते मान्यवरांचा शाल, श्रीफळ, उपरणे देऊन सत्कार करण्यात आला. या कीर्तन सोहळ्यात मृदंगाचार्य आबा गव्हाणे, व्यकटेश फड, सुशील महाराज निगडे, सोमनाथ महाराज भालेराव, गायनाचार्य राधाकृष्ण गरड गुरुजी यांनी सेवा रुजू केली. सोहळ्याची सांगता लक्ष्मण महाराज पाटील यांच्या कीर्तनाने हरिनाम गजरात झाली. यावेळी कीर्तनकार पाटील महाराज यांचा सत्कार पै. किसन लांडगे, श्री संत ज्ञानेश्वर महाराज थोरल्या पादुका मंदिर देवस्थांन ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष ॲड. विष्णू तापकीर यांचे हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी माजी नगराध्यक्ष राहुल चिताळकर पाटील उपस्थित होते. मंदिर परिसरात सोहळ्याचे काळात अनुष्का केदार हिने रांगोळी काढत भाविकांचे लक्ष वेधले. सोहळ्यात महापूजा, काकडा आरती, ज्ञानेश्वरी पारायण, श्री गाथा भजन, महिला भजनी मंडळाची भजने ,हरिपाठ, हरिकीर्तन व हरी जागर कार्यक्रम उत्साहात झाले. भाविकांना अन्नदान महाप्रसाद वाटप करण्यात आले. मंदिरावर देवस्थान तर्फे पुष्प सजावट व लक्षवेधी विद्युत रोषणाई करण्यात आली होतो. भाविकांनी दर्शनास मोठ्या संख्येने गर्दी करून श्रींचे दर्शन घेतले.

MahaBulletin

Recent Posts

खेड तालुका सहकारी खरेदी विक्री संघाचे संचालकपदी सतीश चांभारे यांची निवड

महाबुलेटीन न्यूज | राजगुरूनगर खेड कृषी उत्पन्न बाजार समिती सेवानिवृत्त सचिव सतीश चांभारे यांची खेड…

1 month ago

ज्ञानेश्वरी काव्यार्थ ग्रंथाचा प्रकाशन सोहळा संपन्न

महाबुलेटीन न्यूज l प्रसन्नकुमार देवकर चाकण : युगंधर पब्लिकेशन हाऊस, महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा चाकण,…

1 month ago

स्वच्छ, हरित व सुरक्षित वारीसाठी सूक्ष्म नियोजन करा-विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार विभागीय आयुक्तांकडून पालखी सोहळा पूर्वतयारीचा आढावा

महाबुलेटीन न्यूज l प्रसन्नकुमार देवकर पुणे, दि.१६ : पालखी सोहळ्यात वारकऱ्यांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून…

1 month ago

चाकण येथे कामगार महिलेवर बलात्कार, आरोपीस १२ तासात अटक

महाबुलेटीन न्यूज चाकण : चाकण जवळील मेदनकरवाडी येथील बालाजीनगरमध्ये १३ मे रोजी कामगार महिलेवर झालेल्या…

1 month ago

पहलगाम हल्ल्यानंतर कडेकोट सुरक्षेत चारधाम यात्रेला सुरुवात, केदारनाथ मंदिराचे दरवाजे उघडले

महाबुलेटीन न्यूज : Kedarnath Char Dham Yatra : पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर कडेकोट सुरक्षेत केदारनाथ…

2 months ago

This website uses cookies.