माझा मागचा मोती रत्नाचा लेख वाचून अनेकांचे मला फोन आले,मेसेजेस आले.आम्हाला इतक्या गोष्टी माहीतीच नव्हत्या अशी प्रांजळ कबुलीही काहींनी दिली.आणि लिखाणाचे कौतुकही केले.म्हणूनच आज नव्या हुरुपाने बसलोय लिहायला.
पाचू हे रत्न हिरव्या रंगाचे असते.संस्कृत भाषेत पाचूला मरकत,गुरुत्मक म्हणतात. हिंदीमध्ये पन्ना,हरीन्मणी,पची असे म्हटले जाते तर इंग्रजी भाषेत एमराल्ड म्हणतात.जगात १००% शुध्द पाचू खुप कमी प्रमाणात मिळतो.अशा पाचूची किंमत काही लाखात येते.बाजारात पाचूसारखी दिसणारी रत्ने देखील विकली जातात पण त्यात पाचूचे गुण मात्र अजिबात नसतात.अशी रत्ने साधारण ५०० ते ८०० ₹ प्रती कँरेट विकली जातात. Green Onex नावाचे एक सेमी प्रेशीअस रत्न देखील पाचू म्हणून विकल्याचे अनेकवेळा माझ्या निदर्शनास आले आहे.पाचू अतिशय मौल्यवान रत्न आहे ज्याभावनेनं ग्राहकाने ते घेतलंय त्या भावनेस ठेच लागू नये इतकंच मी म्हणेन.
मन प्रफुल्लित करणारं असं हे रत्न आहे पाचू . पाचुचा इतिहास ४००० वर्षे जुना आहे. जगभरात अनेक ठिकानी पाचूच्या खाणी आहेत.परंतु कोलंबीयन खाणीतीलच पाचू सर्वोत्कृष्ट मानला जातो. हा पाचू अतिशय महाग असतो याचं कारण म्हणजे त्याची शुध्दता. जगात मिस्त्र,रशिया, ब्राझील, इटली,आँस्ट्रेलिया द.अफ्रिका इ.देशातही पाचू मिळतात.
पाचू हे अतिशय बहुगुणी रत्न आहे.आयुर्वेदात पाचूला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. पाचू हे पित्तनाशक, रुचीकारक व बाधा नष्ट करणारे रत्न आहे.शरीरात बळ आणि सुंदरता वाढवणारे हे रत्न आहे.
ज्यांना वाचादोष आहे अशा व्यक्तींनी पाचू अवश्य वापरावा.अडखळत बोलण्याची सवय असणारांनी किंवा नर्वससिस्टीम चे आजार असणारांनी पाचू अवश्य वापरावा नक्कीच फायदा होईल. अर्धशिशी वर पाचू अतिशय गुणकारी मानला जातो.विर्यशक्ती आभाव,जिर्णज्वर,डोळ्यांचे आजार असणारांनीही पाचू वापरावा.
पाचू हा बुधाचा कारक मानला जातो.जिथे बुध येतो तिथे वाणी येते. ओजस्वी वाणीसाठी पाचू परीनामकारक मानला जातो.व्यापारी, वक्ते,वकिल, प्रवचनकार, राजकारणी यांनी पाचू अवश्य वापरावा.पाचू हे अतिशय ठिसूळ असे रत्न आहे.पैलूदार,चमकदार व चांगल्या वजनाने रत्न कधीही वापरण्यास योग्य.
पाचू ओळखावा कसा ? स्वच्छ पाण्यात पाचू ठेवावा.हिरव्या रंगांची आभा जर पाण्यात दिसली तर तो सर्वोत्तम मानावा व खरेदी करणेयोग्यही.ज्यापाचूवर काळेडाग असतात किंवा खडबडीत रेषा असतात असे पाचू घेऊ नये.असे पाचू स्वस्त मिळतात पण त्याचा उपयोग मात्र होत नाही.चोकोनी,आयताकृती, अंडाकृती आकाराचे पाचू अंगठी योग्य असतात.
पडत्या पाण्याच्या थेंबाच्या आकारासारखे पाचू ( ड्राँपशेप ) पदक किंवा कर्नफुलासाठी वापरले जातात.याआकाराचे पाचू १८ कँरेटच्या सोन्यात बसवून दागिने बनविले जातात. आपण जर पाचू घेऊ शकत नसाल तर साधर्म्य असलेली रत्ने घेऊ शकता उदा.पँरीडोट किंवा फिरोजा सारखी रत्ने वापरावी. आयुर्वेदात पाचू सारखेच गुण या रत्नांमध्ये आढळून येतात.आणि किमतीच्या मानाने हि स्वस्त असतात. ३०० ते ५०० रुपये प्रति कँरेट. परंतु स्वस्त पाचू मिळतोय म्हणून खोटी रत्ने वापरू नये.त्याचा उपयोगही होत नाही.पाचूची हुबेहूब नक्कल असणारी रत्ने देखील बाजारात मिळतात.दिसायला पाचूसारखी जरी असली तरी अशी रत्ने पाचू असत नाही.पाचूसारखे बहुमुल्य रत्न घेताना ग्राहकांनी IGI किंवा GII सारख्या मान्यताप्राप्त संस्थेच्या प्रमाणपत्राची मागणी करावी. शक्यतो किमान ७५% रकमेचा परतावा मिळेल अशाच ठिकानाहून रत्ने घ्यावीत.जेणेकरुन ग्राहकाचे आर्थिक नुकसान होणार नाही. किंवा चांगल्या रत्नविषारदाचा सल्ला घ्यावा.[Advt]