जिज्ञासा

दुनिया अनमोल रत्नांची : लाखात देखणा……ओपल

नमस्कार,
मागील टँनझेनाईट रत्नाचा लेख लिहिल्यानंतर मला एक फोन आला. आम्हाला टँनझेनाईट नावाचे एखादे रत्न आहे हे माहितीच नव्हते. अशी प्रांजळ कबुली दिली.लेखाविषयी कौतुक केले.आणि म्हणूनच आज अशाच एका रहस्यमयी रत्नाबद्दल माहिती घेऊया.ओपल.
                ओपल जगात आँस्ट्रेलिया या देशात सर्वाधिक प्रमाणात मिळतो. आँस्ट्रेलिया या देशाचे राष्ट्रीय रत्न ओपल मानले जाते.आम्हा रत्नविशारदांच्या म्हणण्यानुसार आँस्ट्रेलियन ओपल आणि इथोपिअन ओपल जगात सर्वाधिक विकले जातात. तसे ओपल द.अफ्रिका, मेक्सिको आणि ब्राझील इ.देशात देखील मिळतात.परंतु वापरण्यायोग्य ओपल हे आँस्ट्रेलियन आणि इथोपिअन. यातील इथोपिअन ओपल हा आँस्ट्रेलियन ओपलपेक्षा हलक्या प्रतीचा असतो आणि चमक देखील कमी असते. या रत्नाचा रंग दुधाळ असतो. आणि त्यावर सप्तरंग लहरत असतो.
ओपल हे रत्न धातूच्या जेलपासून तयार होते कमी तापमानात. चुना, मार्बल, बेसाल्ट खडकाच्या संयुगांपासून ओपल निर्मिती होते.
ओपल ओळखावा कसा ? ओपल हे रत्न पारदर्शी असत नाही. ओपलवर सप्तरंग लहरत राहतात.आणि अविश्वसनीय अशी चमक असते या रत्नावर. अतिशय ठिसूळ असे हे रत्न असते.नेहमी ओपल खरेदी करतेवेळी आँस्ट्रेलियन ओपलची मागणी करावी. ती ही प्रमाणपत्रासहित.
ज्योतिषशास्त्रानूसार शुक्राचा कारक मानला जातो ओपल.ओपल वापरल्याने पतीपत्नीतील प्रेम वाढीस लागते. एकाग्रता आणि मनशांती साठी ओपल वापरावा असा सल्ला गुरुजी देतात.हे रत्न धारण केल्याने सफलता आणि सांपत्तिक उत्कर्ष होतो असे ही मानले  जाते. आत्मविश्वास वाढीस हे रत्न अतिषय उपयुक्त मानले जाते. संगीत, कला, अभिनय क्षेत्रातील लोकांस ओपल आवर्जून वापरण्यास सांगतात.
      आयुर्वेदानूसार ओपल रत्न धारण केल्याने, शुक्राणू वाढीस मदत होते. आत्मविश्वास वाढतो. शरीर तेजपुंज होते असे म्हणतात. ओपल वापरताना नेहमी ३.कँरेट ५० सेंटपेक्षा अधिक वजनाचा घ्यावा. प्रमाणपत्रासहीत. चांगल्या आँस्ट्रेलिअन ओपलची किंमत ३५०० ते ५००० ₹ प्रती कँरेट येते. बाजारात हल्ली ५०० ते ६०० रुपये प्रती कँरेटचे रत्न पहावयास मिळतात. परंतू अशी रत्ने इथोपिअन असतात.जे गुणवत्ता शुन्य असतात. ओपल बद्दल जाता आणखी दोन रोचक तथ्ये सांगतो. ओपल हे रत्न ६० लाख वर्षांपासून प्रूथ्वीवर अस्तित्वात आहे म्हणजे अगदी डायनासोर अस्तिवात असल्यापासून. आणि दुसरे तथ्य म्हणजे ओपल पाढऱ्या, निळ्या, गुलाबी, फिरोज रंगात सुध्दा मिळतात.
       असे हे रहस्यमय रत्न खरेदी करण्यापूर्वी एका गुरुजींशी चर्चा करुनच घ्यावे इतकेच सांगेल.
गणेश बेल्हेकर
बेल्हेकर ज्वेलर्स
राजगुरुनगर
९६५७३२२१०२/९८२२७९९८९८
admin

Recent Posts

पुणे-नाशिक व नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गांच्या दुरुस्तीची तातडीने आवश्यकता; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची केंद्रीय मंत्री नितीन गडकरींकडे पत्राद्वारे मागणी

महाबुलेटीन न्यूज l किशोर कराळे मुंबई, दि. ७: पुणे-नाशिक आणि नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गांवर मोठ्या प्रमाणात…

2 months ago

पुणे-रायगड-नगर-नाशिक जिल्ह्यासाठी GOOD NEWS..!

महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर पुणे : हडपसर ते यवत आणि‌ तळेगाव-चाकण शिक्रापूर महामार्गाच्या रुंदीकरणासाठी…

2 months ago

एक वर्षांपासून वाँटेड आरोपीस पिस्तूलसह अटक, गुन्हे शाखा युनिट तीनची कामगिरी

महाबुलेटीन न्यूज महाळुंगे ( चाकण एमआयडीसी ) : एक वर्षापासुन पाहीजे असलेल्या आरोपी कडुन १…

2 months ago

40 वर्षांच्या तलाठ्यासोबत 20 वर्षीय कॉलेज तरुणी आढळली मृतावस्थेत, पुणे जिल्ह्यातील घटना, कार अन् चपलेमुळे भयंकर प्रकार समोर

महाबुलेटीन न्यूज | आनंद कांबळे जुन्नर : पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील दुर्गावाडी परिसरात एक धक्कादायक…

2 months ago

खेड तालुका सहकारी खरेदी विक्री संघाचे संचालकपदी सतीश चांभारे यांची निवड

महाबुलेटीन न्यूज | राजगुरूनगर खेड कृषी उत्पन्न बाजार समिती सेवानिवृत्त सचिव सतीश चांभारे यांची खेड…

3 months ago

This website uses cookies.