जिज्ञासा

दुनिया अनमोल रत्नांची : चमत्कार चमकण्याचा … लसण्या

 

दुनिया अनमोल रत्नांची : चमत्कार चमकण्याचा … लसण्या

 

नमस्कार,
आज आपण नवरत्नातील अशा एका रत्ना बद्दल माहीती घेणार आहोत की, जो स्वत:मध्येच एक चमत्कार सामावून बसला आहे. चमत्कार चमकण्याचा….. लसण्या.

लसण्या नवरत्नातील एक प्रमुख रत्न मानले जाते. संस्कृतमध्ये लसण्याला वैडुर्य, विदुररत्न, बालसुर्य म्हणतात. हिंदी मध्ये लहसुनिया तर इंग्रजी मध्ये Cat’s Eye म्हणतात. लसण्या जगभरात सर्वाधिक मोठ्या प्रमाणात चीन आणि म्यानमारमध्ये मिळतो. तसा तो ब्राझील, भारत आणि श्रीलंकेत देखील पण मिळतो. पण चीन आणि म्यानमार हे प्रमुख उत्पादक देश आहेत.

लसण्या साधारण चार प्रमुख रंगात मिळतो. सफेद, काळा, पिवळा, फिक्कट हिरवा. यातील ज्योतिषशास्त्रानूसार फिकट हिरव्या रंगाचा लसण्या वापरण्यास योग्य. थोड्याशा व्यावसायिक लाभासाठी सफेद आणि पिवळा लसण्या बाजारात विकला जातो हे अनेकदा माझ्या निदर्शनास आले आहे. जे एक व्यावसायिक म्हणून अयोग्य आहे. कारण एक हिरव्या रंगाचा लसण्या सोडला तर इतर रंगांचा उपयोग काही होत नाही. असे आमच्या रत्नशास्त्रात मानक आहे. रत्न विकणाऱ्या व्यावसायिकांनी देखील असे करु नये, हि शुध्द फसवणूक आहे इतकेच मी म्हणेन.

या चारही रंगाच्या रत्नांमध्ये एक गोष्ट मात्र समान आहे. ती म्हणजे या रत्नांवर असलेल्या शुभ्र रेषा. तीन ते चार एकसमान शुभ्र रंगाच्या रेषा आपणांस या रत्नांवर पहायला मिळतात. ज्या अंधारात थोड्याशा प्रकाशाने परावर्तित होतात. या अशाप्रकारे रेषा परावर्तित होणं हेच या रत्नाचे खरे असण्याचे प्रमाणपत्र असते. जर रेषा परावर्तित झाल्या नाही, तर समजावे रत्न खरे नाही.

स्वच्छ, चांगला आकार, वजनदारपणा आणि स्पष्ट रेषा असलेला लसण्याची मागणी ग्राहकांनी करावी. अशा रत्नाची किंमत ३००० ₹ प्रति कँरेट येते. बाजारात हल्ली ३०० ते ५०० रुपये प्रती कँरेटचे रत्न पहावयास मिळतात, पण अशी रत्ने गुणवत्ता शुन्य असतात.

आयुर्वेदात लसण्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. नैराश्य, मानसिक खच्चीकरण झालेले, निद्रानाश असणारांनी लसण्या वापरावा. चित्तवृत्तीत फरक पडतो. त्वचा विकारांवर, जंत, पुरळ, फोड यावर लसण्या गुणकारी मानला जातो. लहान मुलांच्या गळ्यात जर लसण्याचे पेंन्डंट करुन घातले तर बालदमा सारखे विकार जडत नाहीत.

या रत्नाची एक काळी बाजू देखील आहे. ज्यांचा जादुटोणा, काळी जादू, करणी अशा गोष्टींवर विश्वास असतो अशी मंडळी देखील या पासून संरक्षण व्हावे म्हणून हे रत्न वापरतात. अर्थात माझा या असल्या अघोरी विद्यांवर विश्वास नाही, त्यामुळे या बद्दल मी फार लिहीणे संयुक्तिक ठरणार नाही, म्हणून केवळ ही जुजबी माहीती दिली.

असे रत्न केतूच्या अधिपत्याखाली येते. म्हणून खरेदी करतेवेळी गुरुजींचा सल्ला घेऊन वापरावे. रत्नशास्त्राधारीत चांगले रत्न द्यायची जबाबदारी आमची असते. पण ज्योतिषशास्त्रानूसार आपणांस ते लाभेल की नाही, हे मात्र गुरुजीच सांगू शकतात हि वस्तुस्थिती नाकारुन चालत नाही हेच खरे……..धन्यवाद.

श्री. गणेश बेल्हेकर
बेल्हेकर ज्वेलर्स
राजगुरुनगर
९६५७३२२१०२
९८२२७८८८९८

MahaBulletin Team

Recent Posts

पुणे-नाशिक व नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गांच्या दुरुस्तीची तातडीने आवश्यकता; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची केंद्रीय मंत्री नितीन गडकरींकडे पत्राद्वारे मागणी

महाबुलेटीन न्यूज l किशोर कराळे मुंबई, दि. ७: पुणे-नाशिक आणि नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गांवर मोठ्या प्रमाणात…

2 months ago

पुणे-रायगड-नगर-नाशिक जिल्ह्यासाठी GOOD NEWS..!

महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर पुणे : हडपसर ते यवत आणि‌ तळेगाव-चाकण शिक्रापूर महामार्गाच्या रुंदीकरणासाठी…

2 months ago

एक वर्षांपासून वाँटेड आरोपीस पिस्तूलसह अटक, गुन्हे शाखा युनिट तीनची कामगिरी

महाबुलेटीन न्यूज महाळुंगे ( चाकण एमआयडीसी ) : एक वर्षापासुन पाहीजे असलेल्या आरोपी कडुन १…

2 months ago

40 वर्षांच्या तलाठ्यासोबत 20 वर्षीय कॉलेज तरुणी आढळली मृतावस्थेत, पुणे जिल्ह्यातील घटना, कार अन् चपलेमुळे भयंकर प्रकार समोर

महाबुलेटीन न्यूज | आनंद कांबळे जुन्नर : पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील दुर्गावाडी परिसरात एक धक्कादायक…

2 months ago

खेड तालुका सहकारी खरेदी विक्री संघाचे संचालकपदी सतीश चांभारे यांची निवड

महाबुलेटीन न्यूज | राजगुरूनगर खेड कृषी उत्पन्न बाजार समिती सेवानिवृत्त सचिव सतीश चांभारे यांची खेड…

3 months ago

This website uses cookies.