कृषी

१ ऑगस्टला दुध दरवाढीसाठी आंदोलन होणार : हर्षवर्धन पाटील

महाबुलेटिन नेटवर्क
इंदापूर : दुध दरवाढीकडे सरकारचे लक्ष वेधून घेण्यासाठी शनिवारी (दि.१ऑगस्ट) सकाळी अकरा वाजता भाजप व महायुतीतील रयत क्रांती,रिपब्लिकन पक्ष (आठवले गट), रासप, शिवसंग्राम या मित्रपक्षांसह इंदापूर तालुक्यात गावोगावी दुध दरवाढीचे आंदोलन छेडण्यात येणार आहे, अशी माहिती माजी मंंत्री, भाजपनेते हर्षवर्धन पाटील यांनी दिली.
ते म्हणाले की, कोरोनाच्या संकटामुळे दुध उत्पादक संकटात सापडला आहे. हॉटेल व अन्य व्यावसायिकांकडून दुध खरेदी थांबली आहे. शेतकऱ्यांच्या दुधाला प्रतिलिटर सतरा ते एकोणीस रुपये दर दिला जात आहे. दुधाचा उत्पादन खर्च ही त्यामुळे वसूल होत नाही. राज्यभरात हीच परिस्थिती आहे. राज्यशासनाने गाईच्या दुधास ३० रुपये प्रतिलिटर दर द्यावा. शेतकऱ्यांकडील सर्व दूधाची खरेदी करावी. अतिरिक्त दुधाची शासनाने भुकटी तयार करावी. दुधास प्रतिलिटर १० रुपये अनुदान द्यावे, अश्या आमच्या प्रमुख मागण्या आहेत.
या मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी दि.२१ जुलै रोजी इंदापूरसह संपूर्ण राज्यात आंदोलन करण्यात आले होते. मागण्यांचा विचार झाला नाही तर दि.१ ऑगस्ट रोजी एल्गार आंदोलन करण्यात येईल असा इशारा निवेदनाद्वारे मुख्यमंत्र्यांना देण्यात आला होता, असे पाटील यांनी सांगितले. राज्यशासनाने निवेदनाची दखल घेतली नाही. त्यामुळे दिलेल्या इशा-यानुसार दि.१ ऑगस्टचे आंदोलन केले जाणार आहे. राज्य सरकारला दूध दरवाढीचा निर्णय घेण्यास भाग पाडले जाईल, असा आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केला.
admin

Share
Published by
admin

Recent Posts

MahaBulletin — 02 Aug 2026

शुक्रवार, ३१ जुलै २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 आज…

13 hours ago

MahaBulletin — 31 Jul 2026

गुरुवार, ३० जुलै २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 खेडमध्ये…

3 days ago

MahaBulletin — 29 Jul 2026

मंगळवार, २८ जुलै २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 खेड…

5 days ago

MahaBulletin — 27 Jul 2026

रविवार, २६ जुलै २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 नीट…

7 days ago

MahaBulletin — 26 Jul 2026

शनिवार, २५ जुलै २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 💧 खेडमध्ये…

1 week ago

MahaBulletin — 23 Jul 2026

बुधवार, २२ जुलै २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 5 बातम्या 💧 अतिवृष्टी…

2 weeks ago

This website uses cookies.