विधायक

बारा हजार रुपयांची रोकड असणारी बॅग तरुणीने केली मूळ मालकाला परत, स्नेहा भोंग हिचे परिसरात कौतुक

महाबुलेटीन नेटवर्क / शैलेश काटे
इंदापूर : कोरोनामुळे आलेल्या आर्थिक संकटाच्या काळात कोणी कोणाला एक पैसा सोडत नाही. विनासायास मिळालेले पैसे तर दाखवतच नाही. अश्या परिस्थितीत बारा हजार रुपयांची रोकड असणारी बॅग मूळ मालकाला देवून निमगाव केतकी येथील स्नेहा भोंग हिने आपल्यावरील सुसंस्काराचे दर्शन घडवले आहे.
सविस्तर हकीकत अशी की, देविदास जगन्नाथ शिंदे हे आपल्या मुलासह दुचाकीवरुन इंदापूरमधून शेळगावकडे जात असताना वाटेतच त्यांची बॅग पडली. त्या बॅगमध्ये बारा हजार रुपये, बँकेचे पासबुक, आधारकार्ड व इतर महत्वाची कागदपत्रे होती.
दरम्यानच्या काळात स्नेहा ही आपले चुलते बहुजन मुक्ती पार्टीचे तालुकाध्यक्ष बाबासाहेब भोंग यांच्या समवेत दुचाकीवरुन इंदापूरहून निमगाव केतकी येथील आपल्या घरी जात असताना, तिला ही बॅग दिसली. तिने भोंग यांना त्याबाबत सांगितले.
बॅगमधील कागदपत्रावरुन देविदास शिंदे यांचे नाव पाहून भोंग यांनी रयत क्रांती संघटनेचे पुणे जिल्हाध्यक्ष निलेश देवकर यांच्याशी संपर्क साधला. देवकर यांनी देविदास शिंदे यांना फोनवरून माहिती विचारली. त्यांनी ही घडलेली हकीकत सांगितली. सर्व तपशील सांगितला व खात्री झाल्यानंतर इंदापूरला परतताना स्नेहा व बाबासाहेब भोंग यांनी शिंदे यांना त्यांची बॅग परत केली.
admin

Recent Posts

MahaBulletin — 16 Sep 2026

सोमवार, १४ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 गणेशोत्सवाचा…

23 hours ago

MahaBulletin — 14 Sep 2026

रविवार, १३ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 💧 इंद्रायणी…

3 days ago

MahaBulletin — 13 Sep 2026

शनिवार, १२ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🏛️ बँक…

4 days ago

MahaBulletin — 12 Sep 2026

गुरुवार, १० सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🏛️ पुणे…

5 days ago

MahaBulletin — 10 Sep 2026

सोमवार, ७ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 जिल्हा…

7 days ago

MahaBulletin — 07 Sep 2026

रविवार, ६ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 कामगार…

1 week ago

This website uses cookies.