महाबुलेटीन न्यूज
पुणे दि.14: भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३० व्या जयंतीनिमित्त सामाजिक न्याय विभागाच्या वतीने सामाजिक न्याय विभागाचे राज्यमंत्री श्री विश्वजीत कदम यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नियमांचे पालन करत अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी माजी राज्यमंत्री श्री. रमेश बागवे, राज्याचे समाज कल्याण विभागाचे आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे, बार्टीचे महासंचालक धम्मज्योती गजभिये उपस्थित होते.
अभिवादन कार्यक्रमानंतर राज्यमंत्री श्री. विश्वजीत कदम यांनी राज्याचे मुख्यालय असलेल्या समाज कल्याण आयुक्तालयात देखील भेट देऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
● भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनी प्रशासनाकडून अभिवादन :-
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त प्रशासनातर्फे त्यांना अभिवादन करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयात आज झालेल्या कार्यक्रमावेळी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे, पुणे उपविभागीय अधिकारी संतोषकुमार देशमुख यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. यावेळी पुणे शहर तहसीलदार श्रीमती तृप्ती कोलते तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते.
महाबुलेटीन न्यूज l किशोर कराळे मुंबई, दि. ७: पुणे-नाशिक आणि नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गांवर मोठ्या प्रमाणात…
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर पुणे : हडपसर ते यवत आणि तळेगाव-चाकण शिक्रापूर महामार्गाच्या रुंदीकरणासाठी…
महाबुलेटीन न्यूज महाळुंगे ( चाकण एमआयडीसी ) : एक वर्षापासुन पाहीजे असलेल्या आरोपी कडुन १…
महाबुलेटीन न्यूज | आनंद कांबळे जुन्नर : पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील दुर्गावाडी परिसरात एक धक्कादायक…
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर चाकण ( पुणे ) : महाराष्ट्र हे उद्योगांना प्रोत्साहन देणारे…
महाबुलेटीन न्यूज | राजगुरूनगर खेड कृषी उत्पन्न बाजार समिती सेवानिवृत्त सचिव सतीश चांभारे यांची खेड…
This website uses cookies.