शैक्षणिक

ज्ञानेश्वर विद्यालयात गुणवंत शिक्षक विद्यार्थी यांचा ऑनलाईन सत्कार

महाबुलेटीन न्यूज / प्रतिनिधी
आळंदी : महाराष्ट्र राज्य  माध्यमिक व उच्च माध्यमिक  शिक्षण मंडळ तर्फे घेण्यात आलेल्या एच एस सी व एस एस सी  परीक्षेत खेड तालुक्यामध्ये सर्वात मोठी विद्यार्थी संख्या असलेल्या शाळांत श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेच्या श्री ज्ञानेश्वर विद्यालय व ज्युनिअर कॉलेजचे नाव लौकिकाला आणणाऱ्या गुणवंत  विद्यार्थ्यांचा ऑनलाईन सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या.
याप्रसंगी श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्था संस्थेचे अध्यक्ष सुरेश वडगावकर, सचिव अजित वडगावकर, खजिनदार डॉ. दिपक पाटील, विश्वस्त प्रकाश काळे, प्राचार्य दिपक मुंगसे, उपमुख्याध्यापक सिद्धनाथ चव्हाण, पर्यवेक्षक सूर्यकांत मुंगसे, किसन राठोड, प्रशांत सोनवणे, माजी प्राचार्य गोविंद यादव, ज्ञानेश्वर प्राथमिक विद्यामंदिराचे मुख्याध्यापक प्रदीप काळे उपस्थित होते.
यावेळी अध्यापिका हेमांगी कारंजकर यांनी सुमधुर स्वागत गीताने सुरुवात केली. प्रास्ताविकात सचिव अजित वडगावकर यांनी शाळेच्या इतिहासात एस एस सी बोर्डामध्ये शाळेचा प्रथमच १०० टक्के निकाल लागल्याने आपला आनंद व्यक्त करत शिक्षकांनी वर्षभर केलेल्या कर्तुत्वाने व प्रयत्नाने तसेच विद्यार्थ्यांच्या अथक परिश्रमामुळे शाळा तालुक्यात प्रथम स्थानावर आली, म्हणून विद्यार्थी शिक्षक व पालक यांचे मनःपूर्वक अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. संस्थेस गुणवत्ता वाढ व भौतिक विकास कामात सर्वांनी मदत करावी, असे आवाहन त्यांनी केले. प्रातिनिधिक स्वरूपात एच एस सी व एस एस सी परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्‍यांचे स्वागत व कौतुक करत अभिनंदन करण्यात आले.
१० वी व १२वी च्या सर्व गुणवंत विद्यार्थ्यां समवेत पालकांनी विद्यार्थी जीवनात शिक्षकांचे महत्त्व मांडत शिक्षका विषयीचा आदर व प्रेम व्यक्त करत भावना व्यक्त केल्या. विद्यालयातील इयत्ता १० वी व १२ वीच्या सर्व वर्गशिक्षका समवेत प्राचार्य दिपक मुंगसे, माजी प्राचार्य गोविंद यादव,  डॉ. दिपक पाटील, संस्था अध्यक्ष सुरेश वडगांवकर यांनी गौरवशाली यशाची प्रशंसा करत संस्थेच्या सर्व घटकाचे गुणवत्ता वाढ व विकास समितीचे पर्यवेक्षक सुर्यकांत मुंगसे, समन्वयक अनिता गावडे यांचे अभिनंदन केले. सूत्रसंचालन सुर्यकांत मुंगसे यांनी केले. कार्यक्रम ऑनलाईन करण्यासाठी प्रकाश भागवत यांनी तांत्रिक सहाय्य केले. आभार प्रशांत सोनवणे यांनी मानले. पसायदान गायनाने कार्यक्रमाची सांगता झाली
admin

Recent Posts

MahaBulletin — 05 Sep 2026

गुरुवार, ३ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…

3 hours ago

MahaBulletin — 03 Sep 2026

मंगळवार, १ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ कुकडी…

2 days ago

MahaBulletin — 01 Sep 2026

सोमवार, ३१ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 राजगुरुनगरमध्ये…

4 days ago

MahaBulletin — 31 Aug 2026

रविवार, ३० ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 अपघातांची…

5 days ago

MahaBulletin — 29 Aug 2026

शुक्रवार, २८ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 5 बातम्या 📰 चाकणमध्ये…

1 week ago

MahaBulletin — 28 Aug 2026

बुधवार, २६ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ चाकण…

1 week ago

This website uses cookies.