आंबेगाव

डिंभे धरणातून ४२२० हजार क्लुसेक्सने विसर्ग सुरू

महाबुलेटिन न्यूज नेटवर्क

घोडेगाव : पुणे जिल्ह्यातील कुकडी प्रकल्पातील सर्वात मोठे धरण म्हणून ओळखले जाणारे आंबेगाव तालुक्यातील हुतात्मा बाबू गेनू जलाशय (डिंभे धरण) ९९ टक्के भरले असून पावसाची संततधार सुरू असल्याने घोड नदीत ४२२० हजार क्लुसेक्सने विसर्ग सुरू करण्यात आला आहे. धरण परिसरात सध्या जोरदार पाऊस सुरू असल्याने विसर्ग अजून वाढविण्यात येणार असल्याने नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

गेल्या काही दिवसांपासून आहुपे, भीमाशंकर, पाटण खोऱ्यात चांगला पाऊस पडत असल्याने डिंभा धरण आज ओव्हरफ्लो झाले आहे. त्यामुळे आज सकाळी ७ वाजता घोड नदीत ४२२० हजार क्लुसेक्सने विसर्ग सुरू करण्यात आला आहे. पाऊस असाच सुरू राहिला तर विसर्ग वाढविण्यात येणार आहे. त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क रहावे. या धरणाचा फायदा आंबेगाव तालुक्याबरोबरच जुन्नर, शिरूर तालुक्यांना त्याचप्रमाणे नगर जिल्ह्यातील श्रीगोंदा व सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यात देखील होत असतो. त्यामुळेच या परिसरातील शेतकऱ्यांचा पाण्याचा प्रश्न सुटला आहे. धरणातील पाणीसाठ्यामुळे शेतकऱ्यांची चिंता दूर झाली असून आनंदाचे वातावरण पसरले आहे.
admin

Recent Posts

MahaBulletin — 10 May 2026

शनिवार, ९ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 वृद्धेचा…

3 days ago

MahaBulletin — 09 May 2026

शुक्रवार, ८ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🐾 बिबट्याची…

4 days ago

MahaBulletin — 07 May 2026

बुधवार, ६ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 एमआयडीसीतील…

6 days ago

MahaBulletin — 06 May 2026

मंगळवार, ५ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 बालकावर…

7 days ago

MahaBulletin — 05 May 2026

सोमवार, ४ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 बालकांवरील…

1 week ago

MahaBulletin — 30 Apr 2026

बुधवार, २९ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 खेडमध्ये…

2 weeks ago

This website uses cookies.