आंतरराष्ट्रीय

दिलासादायक : कोरोनावरील औषध दृष्टीपथात : डीआरडीओने विकसित केलेल्या कोविड-प्रतिबंधक औषधाला डीसीजीआयची मंजुरी…

दिलासादायक : कोरोनावरील औषध दृष्टीपथात : डीआरडीओने विकसित केलेल्या कोविड-प्रतिबंधक औषधाला डीसीजीआयची मंजुरी…

महाबुलेटीन न्यूज नेटवर्क
दिल्ली : कोरोनाच्या रूग्णांवरील आपत्कालीन वापरासाठी डीआरडीओने विकसित केलेल्या कोविड-प्रतिबंधक औषधाला डीसीजीआयची मंजुरी मिळाली आहे. हैदराबादच्या डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीज (डीआरएल)च्या सहयोगातून संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या (डीआरडीओ) न्यूक्लियर मेडिसिन अँड अलाइड सायन्सेस (आयएनएमएएस) या प्रयोगशाळेने कोविड-19 विरोधात उपचारात्मक अनुप्रयोग करण्यासाठी 2-डीऑक्सी-डी-ग्लूकोज (2-डीजी) हे औषध विकसित केले आहे.

आतापर्यंतच्या क्लिनिकल चाचणी परिणामांनी असे दर्शविले आहे की, हे रेणू, रुग्णालयात दाखल झालेल्या रूग्णांना जलद बरे होण्यास मदत करतात आणि ऑक्सिजनवरील अवलंबित्व कमी करतात. 2-डीजीने उपचार केलेल्या मोठ्या प्रमाणावरील रुग्णांची आरटी-पीसीआर निगेटिव्ह दिसून आली. कोविड-19ने ग्रस्त लोकांना या औषधाचा प्रचंड फायदा होईल. 

महामारीविरोधात सज्जतेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत डीआरडीओने 2-डीजी-कोविड-विरोधी उपचारात्मक अनुप्रयोग विकसित करण्याचा पुढाकार घेतला. विविध मानकांच्या धर्तीवर कार्यक्षमतेचा कल बघता प्रमाणित औषधांच्या तुलनेत 2-डीजीने लक्षणे असलेले रुग्ण जलद बरे झाले. 

यशस्वी निकालांच्या आधारे डीसीजीआयने नोव्हेंबर 2020मध्ये तिसऱ्या टप्प्यातील क्लिनिकल चाचण्यांना परवानगी दिली. डिसेंबर 2020 ते मार्च 2021 दरम्यान दिल्ली, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, गुजरात, राजस्थान, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक आणि तामिळनाडू मधील 27 कोविड रुग्णालयात 220 रुग्णांवर तिसऱ्या टप्प्यातील क्लिनिकल चाचणी घेण्यात आली. तिसऱ्या टप्प्यातील क्लिनिकल चाचणीचा सविस्तर डेटा डीसीजीआयकडे सादर करण्यात आला.

औषध पावडर स्वरुपात मिळणार : DRDO ने विकसित केलेले हे औषध गोळी, सिरप किंवा इंजेक्शन नाही तर पावडर स्वरुपात पाकिटामध्ये मिळते, जे पाण्यात विरघळवून पिता येते. हे विषाणू, संक्रमित पेशींमध्ये जमा होऊन व्हायरल संश्लेषण आणि उर्जा उत्पादन थांबवून विषाणू वाढीस प्रतिबंधित करते. विषाणूंनी संक्रमित पेशींमध्ये त्याचे निवडक संग्रह हे औषध उत्कृष्ट बनवते. जेव्हा देशभरात रुग्णांची संख्या सातत्याने वाढत असते आणि रुग्णांना ऑक्सिजनची गरज असते अशा वेळी हे औषध खूप प्रभावी सिद्ध होऊ शकते. असा दावा केला जात आहे. या औषधांमुळे रुग्णांना बराच काळ रुग्णालयात राहण्याची गरज भासणार नाही.
——-

MahaBulletin Team

Recent Posts

पुणे-नाशिक व नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गांच्या दुरुस्तीची तातडीने आवश्यकता; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची केंद्रीय मंत्री नितीन गडकरींकडे पत्राद्वारे मागणी

महाबुलेटीन न्यूज l किशोर कराळे मुंबई, दि. ७: पुणे-नाशिक आणि नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गांवर मोठ्या प्रमाणात…

2 months ago

पुणे-रायगड-नगर-नाशिक जिल्ह्यासाठी GOOD NEWS..!

महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर पुणे : हडपसर ते यवत आणि‌ तळेगाव-चाकण शिक्रापूर महामार्गाच्या रुंदीकरणासाठी…

2 months ago

एक वर्षांपासून वाँटेड आरोपीस पिस्तूलसह अटक, गुन्हे शाखा युनिट तीनची कामगिरी

महाबुलेटीन न्यूज महाळुंगे ( चाकण एमआयडीसी ) : एक वर्षापासुन पाहीजे असलेल्या आरोपी कडुन १…

2 months ago

40 वर्षांच्या तलाठ्यासोबत 20 वर्षीय कॉलेज तरुणी आढळली मृतावस्थेत, पुणे जिल्ह्यातील घटना, कार अन् चपलेमुळे भयंकर प्रकार समोर

महाबुलेटीन न्यूज | आनंद कांबळे जुन्नर : पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील दुर्गावाडी परिसरात एक धक्कादायक…

2 months ago

खेड तालुका सहकारी खरेदी विक्री संघाचे संचालकपदी सतीश चांभारे यांची निवड

महाबुलेटीन न्यूज | राजगुरूनगर खेड कृषी उत्पन्न बाजार समिती सेवानिवृत्त सचिव सतीश चांभारे यांची खेड…

3 months ago

This website uses cookies.