अपघात

देव तारी त्याला कोण मारी…. इमारत कोसळून अडीच तास ढिगाऱ्याखाली सापडूनही मुलगी सुखरूप बचावली..

देव तारी त्याला कोण मारी…. इमारत कोसळून अडीच तास ढिगाऱ्याखाली सापडूनही मुलगी सुखरूप बचावली..

महाबुलेटीन न्यूज । विशेष प्रतिनिधी
पिंपळे गुरव : फुगेवाडी येथील स्टार स्पोर्ट्स क्लब चौकात आज ( दि. २८ ऑगस्ट ) एक अत्यंत जुनी असलेली इमारत अचानक कोसळली. सकाळी साडेनऊच्या दरम्यान तळमजल्यावरील असणाऱ्या इमारतीचा जमिनीचा भाग अचानकरित्या तळमजल्यावर कोसळला. यावेळी इमारतीच्या पहिल्या मजल्यावर असणारी पौर्णिमा उर्फ अशु (वय १५) ही मुलगी कोसळलेल्या मातीच्या ढिगाऱ्यात अडकली. यावेळी शर्थीचे प्रयत्न केल्यानंतर अडीच तासानंतर तिला वाचविण्यात यश आले. यावेळी स्थानिक रहिवासी मयुर पुंडे यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता त्या मुलीला धीर देत तब्बल अडीच तास शर्थीचे प्रयत्न करून ढिगाऱ्यातून बाहेर काढून तिचे प्राण वाचविण्यात यश मिळविले. 

फुगेवाडी येथे जवळपास चाळीस ते पंचेचाळीस वर्षांपूर्वीची इमारतीचा काही भाग शनिवारी सकाळी सुमारे साडेनऊच्या दरम्यान अचानक कोसळला. या इमारतीमध्ये मातीच्या ढिगाऱ्याखाली पौर्णिमा उर्फ अशु नावाची १५ वर्षांची एक मुलगी अडकून पडली होती. यावेळी घरात महिलेसह त्यांच्या दोन मुली होत्या. यावेळी स्थानिक रहिवासी भीमराव चौधरी यांनी सर्वप्रथम महिलेला व एका लहानग्या मुलीला सुरक्षितरित्या बाहेर काढले. दुर्घटना घडताच स्थानिक रहिवाशांनी अग्निशामक दलाला, स्थानिक नगरसेवकांना घटनेची माहिती दिली. यावेळी वल्लभनगर, भोसरी, रहाटणी येथील अग्निशामक दलाचे जवान व एनडीआरएफचे जवान मोठ्या संख्येने दाखल झाले होते. 

घटनास्थळी दाखल झालेले एन डी आर एफ व अग्निशामक दलाचे जवान यांनी तसेच स्थानिक रहिवाशी मयुर पुंडे यांनी तब्बल अडीच तास आत मध्ये राहून आत अडकलेल्या मुलीशी संवाद साधत, तिला तीन ते चार वेळा पाणी पाजून, तिला धीर देत शर्थीचे प्रयत्न करून सुरक्षितरित्या बाहेर काढण्यात यश मिळविले. तिला बाहेर काढताच सर्वप्रथम जवनांनी रुग्णवाहिकेतून वायसीएम रुग्णालयात पाठविले. तिची प्रकृती ठीक असून तिचे दोन्ही पाय मातीच्या ढिगाऱ्यात अडकल्याने किरकोळ जखमा झाल्याने तिला रुग्णालयात पाठविल्याचे अग्निशामक दलाच्या जवानांनी सांगितले.

दुर्घटना घडल्याने फुगेवाडी परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. त्यामुळे पोलिसांनी घटनास्थळी कुणी येऊ नये, यासाठी परिसरातील नागरिकांना घटनास्थळापासून लांब ठेवण्यासाठी प्रयत्न केले. सदर घटनेची माहिती मिळताच भोसरी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर अवताडे, गुन्हे शाखेचे जितेंद्र कदम, आयपीएस पोलीस अधिकारी मंचक इप्पर, अतिरिक्त आयुक्त अतुल नरवडे, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी ओमप्रकाश दहिवाल, एनडीआरएफचे अधिकारी राजेश भट, सुपिंदर सेठी, महापौर उषा ढोरे, क्षेत्रीय अधिकारी विजय थोरात, नगरसेवक राजू बनसोडे, नगरसेविका आशा शेंडगे, उषा काटे, शेखर काटे, पै. हेमंतभाऊ फुगे, घटनास्थळी दाखल झाले होते.

दुर्घटनेत अडकलेली पौर्णिमा उर्फ अशु (वय १५) दहावीमध्ये शिकत आहे. तिचे वडील संभाजी मडके (वय ४३) कर्वे नगर येथील खाजगी संस्थेत शिपाई म्हणून कार्यरत आहेत. तिची आई मनीषा संभाजी मडके (वय ३५) आणि सर्वात लहान मुलगी निशी संभाजी मडके (वय ६) असे कुटुंब होते. हे कुटुंब गेली बारा वर्षांपासून याठिकाणी भाड्याने राहत होते. ही इमारत अक्षय अशोक देवकर यांची असून त्यांनी संभाजी मडके यांना भाड्याने राहण्यास दिली होती.
———————————————

अग्निशामक दल, पोलीस प्रशासन, रुग्णवाहिका, सेवा व रेस्क्यू टीमच्या साह्याने मदत कार्य सुरू होते. येथील स्थानिक रहिवासी मयूर पुंडे यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता सुरुवातीलाच या इमारतीत प्रवेश केला अडीच तासाच्या अथक प्रयत्नानंतर त्या मुलीला सुखरूप बाहेर काढण्यात आले. मुलीला बाहेर सुखरूप काढता क्षणी नगरसेवक राजू बनसोडे यांनी उचलून घेत त्यांचे अभिनंदन केले व पूर्ण पोलीस प्रशासन अग्निशामक दल व रेस्क्यू टीम, डॉक्टर यांचे टाळ्यांच्या गजरात स्वागत केले. यावेळी नगरसेवक, नगरसेविका, पोलीस प्रशासन, महापालिका अधिकारी, क्षेत्रीय अधिकारी उपस्थित होते.
———————————————

● माझ्या परिसरात एका दुर्घटनेत एक मुलगी ढिगाऱ्यात अडकल्याची माहिती मिळताच मी क्षणाचाही विलंब न करता आत शिरलो. तिला पाहताच तीला मी ओळखले. तिनेही मला पाहून मामा अशी हाक मारली. ती मातीच्या ढिगाऱ्यात अडकलेली पाहिले. तिला धीर दिला, पाणी पाजले, घाबरू नको मी तुझ्या जवळच आहे. असे वारंवार सांगून तिला धीर देत अग्निशामक दलाच्या जवानांच्या मदतीमुळे मी तिला बाहेर काढण्यास यश मिळविले. यावेळी सुरवातीला धोका पत्करून, कोणतेही सुरक्षेचे साधन न वापरल्याने अधिकारी यांनी माझ्याशी हुज्जत घातली. यावेळी त्यांनी मला सुरक्षिततेसाठी डोक्यावर हेल्मेट दिले. असो माझ्या जिवापेक्षा तिचा जीव वाचविणे हे माझे कर्तव्य बजावण्यासाठी मी प्रयत्न करीत होतो, त्यात यश मिळाले.
— मयुर पुंडे, स्थानिक रहिवाशी
००००

MahaBulletin Team

Recent Posts

पुणे-नाशिक व नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गांच्या दुरुस्तीची तातडीने आवश्यकता; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची केंद्रीय मंत्री नितीन गडकरींकडे पत्राद्वारे मागणी

महाबुलेटीन न्यूज l किशोर कराळे मुंबई, दि. ७: पुणे-नाशिक आणि नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गांवर मोठ्या प्रमाणात…

2 months ago

पुणे-रायगड-नगर-नाशिक जिल्ह्यासाठी GOOD NEWS..!

महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर पुणे : हडपसर ते यवत आणि‌ तळेगाव-चाकण शिक्रापूर महामार्गाच्या रुंदीकरणासाठी…

2 months ago

एक वर्षांपासून वाँटेड आरोपीस पिस्तूलसह अटक, गुन्हे शाखा युनिट तीनची कामगिरी

महाबुलेटीन न्यूज महाळुंगे ( चाकण एमआयडीसी ) : एक वर्षापासुन पाहीजे असलेल्या आरोपी कडुन १…

2 months ago

40 वर्षांच्या तलाठ्यासोबत 20 वर्षीय कॉलेज तरुणी आढळली मृतावस्थेत, पुणे जिल्ह्यातील घटना, कार अन् चपलेमुळे भयंकर प्रकार समोर

महाबुलेटीन न्यूज | आनंद कांबळे जुन्नर : पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील दुर्गावाडी परिसरात एक धक्कादायक…

2 months ago

खेड तालुका सहकारी खरेदी विक्री संघाचे संचालकपदी सतीश चांभारे यांची निवड

महाबुलेटीन न्यूज | राजगुरूनगर खेड कृषी उत्पन्न बाजार समिती सेवानिवृत्त सचिव सतीश चांभारे यांची खेड…

3 months ago

This website uses cookies.