आंतरराष्ट्रीय

रोमहर्षक सामन्यात सुपर ओव्हरमध्ये दिल्ली कॅपिटल्सचा किंग्स इलेवन पंजाबवर विजय

 

महाबुलेटीन न्यूज नेटवर्क :
अखेरच्या चेंडूपर्यंत रोमहर्षक झालेला दिल्ली आणि पंजाब यांच्यातील सामना अखेर सुपर ओव्हरमध्ये गेला. दिल्लीच्या १५७ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना पंजाबलाही १५७ धावांवर समाधान मानावे लागले आणि सामना सुपर ओव्हरमध्ये गेला. मयांकने सात चौकार आणि चार षटकारांच्या जोरावर ८९ धावांची धडाकेबाज खेळी साकारली. पण त्याला संघाला विजय मिळवून देता आला नाही.सुपर ओव्हरमध्ये दिल्ली कॅपिटल्सने किंग्स इलेवन पंजाबवर विजय मिळवला.

आयपीएलच्या दुसऱ्या सामन्यात रविवारी किंग्ज इलेव्हन पंजाबची लढत दिल्ली कॅपिटल्सशी झाली. पंजाबचा कर्णधार केएल राहुलने नाणेफेक जिंकत क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. टॉस हरल्यानंतर पहिल्यांदा फलंदाजी करताना दिल्लीने पंजाबला 158 धावांचे लक्ष्य दिले. प्रत्युत्तरात पंजाबची सुरुवात अत्यंत खराब झाली. 55 धावांवर 5 गडी बाद झाले. सध्या मयंक अग्रवाल खेळपट्टीवर आहे. ग्लेन मॅक्सवेल 1 धाव काढून कगिसो रबाडाच्या चेंडूवर श्रेयस अय्यरच्या हाती झेल देऊन बाद झाला.

दिल्लीसाठी रविचंद्रन अश्विनने दोन गडी बाद केले. करुण नायर (1)ला पृथ्वी शॉच्या हाती झेलबाद केले. यानंतर निकोलस पूरनला शून्यावर तंबूत पाठवले. कर्णधार लोकेश राहुल (21) देखील मोहित शर्माच्या चेंडूवर क्लीन बोल्ड झाला.

मार्कस स्टॉयनिसने तुफान फटकेबाजी

दिल्लीकडून खेळताना श्रेयस अय्यरने 37 आणि ऋषभ पंतने 31 धावा केल्या. अखेरीस मार्कस स्टॉयनिसने 21 तुफान फटकेबाजी करत 21 चेंडूत 53 धावा केल्या. दिल्लीचे 7 खेळाडूंनी दहाचा आकडा देखील पार करू शकले नाही. तर पंजाबकडून मोहम्मद शमीने 15 धावा देत 3 बळी घेतले.

दिल्लीची सुरुवात अत्यंत खराब झाली होती. 13 धावांत 5 गडी गमावले होते. यानंतर पंत आणि अय्यरने डाव सावरत चौथ्या गड्यासाठी 73 धावांची भागीदारी केली. अखेरीस स्टॉयनिसच्या खेळावर दिल्लीने 8 गडी बाद 157 धावा केल्या.

बिश्नोई ने डेब्यू मॅचमध्ये में 1 विकेट घेतली

सामन्यात मोहम्मद शमीने सर्वाधिक तीन गडी बाद केले. शमीने शिमरॉन हेटमायर (7), पृथ्वी शॉ (5) आणि श्रेयस अय्यर (39) तंबूत पाठवले. पहिलाच सामना खेळणाऱ्या रवि बिश्नोईने एक गडी बाद केला. त्याने पंतला तंबूत पाठवले. .

त्याआधी शिखर धवन भोपळा न फोडताच धावबाद झाला. त्यानंतर पृथ्वी शॉ (5) मोहम्मद शमीच्या चेंडूवर क्रिस जॉर्डनच्या हाती झेलबाद झाला. शमीने पहिल्यांदाच पावर-प्लेमध्ये एकापेक्षा अधिक गडी बाद केले.

दिल्लीचा डाव हायलाइट्स

टके धावा फलंदाज गोलंदाज

0-5 21/3 शिमरॉन हेत्मायर : 7 धावा मोहम्मद शमी : 2 बळी
6-10 28/0 ऋषभ पंत : 17 धावा —
11-15 44/2 श्रेयस अय्यर : 22 धावा रवि बिश्नोई : 1 बळी
16-20 64/3 मार्कस स्टोइनिस : 52 धावा शेल्डन कॉटरेल : 2 बळी
शमीने आयपीएलमध्ये पहिल्यांदा पावर-प्लेमध्ये एकापेक्षा अधिक गडी बाद केले. मागील सत्रापर्यंत 42 डावांमध्ये त्याने पावर-प्लेमध्ये 80 षटकांत फक्त 7 गडी बाद केले होते. शमीने आयपीएलच्या करिअरमध्ये आतापर्यंत 52 सामन्यांत 42 विकेट घेतल्या आहेत.

शमीने पहिल्यांदा पावर-प्लेमध्ये एकापेक्षा जास्त गडी बाद केले

पंजाबने गत तीन सत्रात आपला सलामी सामना जिंकला आहे. अशात संघ आपला विजयी आलेख कायम राखू इच्छिते. पंजाबने लीगमध्ये सर्वाधिक 14 सामने दिल्ली विरुद्ध जिंकले. दोघांत आतापर्यंत 24 सामने झाले आहेत. दिल्लीने 10 लढत नावे केल्या. गेल्या सत्रात दोघांनी एक-एक सामना जिंकला. दिल्लीने गत सत्रात प्ले ऑफमध्ये स्थान मिळवले होते, मात्र पंजाब टीम सहाव्या स्थानी राहिली होती.

दोन्ही संघ

दिल्ली कॅपिटल्स : पृथ्वी शॉ, शिखर धवन, शिमरॉन हेटमायर, श्रेयस अय्यर (कर्णधार), ऋषभ पंत (यष्टीरक्षक), मार्कस स्टोइनिस, अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, कगिसो रबाडा, एनरिच नोर्त्जे और मोहित शर्मा़

किंग्स इलेवन पंजाब : लोकेश राहुल (कर्णधार आणि यष्टीरक्षक), मयंक अग्रवाल, करुण नायर, सरफराज खान, ग्लेन मॅक्सवेल, निकोलस पूरन, कृष्णप्पा गौतम, क्रिस जॉर्डन, शेल्डन कॉटरेल, रवि बिश्नोई और मोहम्मद शमी

MahaBulletin Team

Recent Posts

पुणे-नाशिक व नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गांच्या दुरुस्तीची तातडीने आवश्यकता; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची केंद्रीय मंत्री नितीन गडकरींकडे पत्राद्वारे मागणी

महाबुलेटीन न्यूज l किशोर कराळे मुंबई, दि. ७: पुणे-नाशिक आणि नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गांवर मोठ्या प्रमाणात…

2 months ago

पुणे-रायगड-नगर-नाशिक जिल्ह्यासाठी GOOD NEWS..!

महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर पुणे : हडपसर ते यवत आणि‌ तळेगाव-चाकण शिक्रापूर महामार्गाच्या रुंदीकरणासाठी…

2 months ago

एक वर्षांपासून वाँटेड आरोपीस पिस्तूलसह अटक, गुन्हे शाखा युनिट तीनची कामगिरी

महाबुलेटीन न्यूज महाळुंगे ( चाकण एमआयडीसी ) : एक वर्षापासुन पाहीजे असलेल्या आरोपी कडुन १…

2 months ago

40 वर्षांच्या तलाठ्यासोबत 20 वर्षीय कॉलेज तरुणी आढळली मृतावस्थेत, पुणे जिल्ह्यातील घटना, कार अन् चपलेमुळे भयंकर प्रकार समोर

महाबुलेटीन न्यूज | आनंद कांबळे जुन्नर : पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील दुर्गावाडी परिसरात एक धक्कादायक…

2 months ago

खेड तालुका सहकारी खरेदी विक्री संघाचे संचालकपदी सतीश चांभारे यांची निवड

महाबुलेटीन न्यूज | राजगुरूनगर खेड कृषी उत्पन्न बाजार समिती सेवानिवृत्त सचिव सतीश चांभारे यांची खेड…

3 months ago

This website uses cookies.