महाबुलेटीन न्यूज / आत्माराम डुंबरे
दावडी : येथील गावडेवस्ती वर एकनाथ पंढरीनाथ गावडे यांच्या घराला शॉर्ट सर्किट मूळे आग लागली असून त्यामध्ये संपूर्ण घर जाळून खाक झाले आहे.
आगीची घटना घर मालकांनी दावडीचे पोलीस पाटील आत्माराम डुंबरे यांना कळवली. त्यांनी त्वरित घटनास्थळी भेट देऊन अग्निशामक दलाची गाडी पाचारण केली. अग्निशामक दलाचे कर्मचारी, पोलीस पाटील व ग्रामस्थांच्या मदतीने ही आग विझविण्यात आली.
या घटनेत घराचे पूर्ण नुकसान झाले असून यामध्ये चाळीस हजार रुपयांची रोकड जळून खाक झाली. तसेच ३ तोळेचे सोने, फ्रीज, एलईडी टीव्ही, फॅन, कपाट, कपडे, गहू-बाजरीची पोती, असे संसारोपयोगी साहित्यासह घराचे वासे, घराचे दरवाजे, जळून खाक झाले. घराचे अंदाचे चार ते पाच लाखाचे नुकसान झाले आहे.
यामध्ये कोणतीही जीवित हानी झाली नाही. घरामध्ये दोन सिलेंडर गॅसच्या टाक्या होत्या. घराला आग लागली असताना या सिलेंडर गॅसच्या टाक्या पोलीस पाटील व ग्रामस्थ यांनी जीव धोक्यात घालून बाहेर काढल्या त्यामुळे मोठा अनर्थ टळला. यावेळी अग्निशामक दल, ग्रामस्थांनी मदत केली.
घराचा पंचनामा पोलीस पाटील, तलाठी सतीश शेळके, कोतवाल देवा ओव्हाळ यांनी केला आहे. हा पंचनामा खेड तहसील कार्यालयाला देऊन या कुटुंबला आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल असे तलाठी यांनी सांगितले. यावेळी रामदास बोत्रे, रमेश होरे, अशोक सातपुते, बाबासाहेब डुंबरे, बाळासाहेब गावडे, संदेश गावडे, सुरेश होरे, शिवाजी कान्हूरकर, ऋषिकेश घाडगे हे ग्रामस्थ उपस्थित होते.
—–
महाबुलेटीन न्यूज l किशोर कराळे मुंबई, दि. ७: पुणे-नाशिक आणि नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गांवर मोठ्या प्रमाणात…
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर पुणे : हडपसर ते यवत आणि तळेगाव-चाकण शिक्रापूर महामार्गाच्या रुंदीकरणासाठी…
महाबुलेटीन न्यूज महाळुंगे ( चाकण एमआयडीसी ) : एक वर्षापासुन पाहीजे असलेल्या आरोपी कडुन १…
महाबुलेटीन न्यूज | आनंद कांबळे जुन्नर : पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील दुर्गावाडी परिसरात एक धक्कादायक…
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर चाकण ( पुणे ) : महाराष्ट्र हे उद्योगांना प्रोत्साहन देणारे…
महाबुलेटीन न्यूज | राजगुरूनगर खेड कृषी उत्पन्न बाजार समिती सेवानिवृत्त सचिव सतीश चांभारे यांची खेड…
This website uses cookies.