महाबुलेटीन न्यूज / प्रतिनिधी
दावडी : गावात ‘एक गाव, एक गणपती’ उत्सव साजरा करण्याचा दावडी ग्रामस्थांनी संकल्प केला आहे.
दावडी गाव हे खेड तालुक्यातील पूर्व भागातील बारा हजार लोकसंख्या असलेलं मोठं गाव आहे. हे गाव वाडया, वस्त्या मध्ये विखुरलेल आहे. गणेश उत्सवाच्या अनुषंगाने सध्या देशभरात कोरोना विषाणू रोगाने नागरिक त्रस्त आहेत व खेड तालुक्यात कोरोना रुग्ण जास्त आढळून आले आहेत. त्यामुळे खेड पोलीस पोलीस स्टेशनच्या सूचनेनुसार ‘एक गाव, एक गणपती’ या संकल्पनेच्या व शासकीय आदेशाचे पालन करून दावडी गावचे ग्रामस्थांनी एकत्र येऊन ‘एक गाव, एक गणपती’ करण्याचा निर्धार केला आहे. दावडी गावात एकूण ३२ मंडळे आहेत.
येथील श्री महालक्ष्मी मंदिरात या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी खेड उपविभागीय अधिकारी गजानन टोम्पे, खेड पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक सतीश गुरव यांच्या प्राप्त आदेशानुसार, पोलीस हवालदार संतोष मोरे, संजय रेपाळे, पोलीस पाटील आत्माराम डुंबरे, मा. सरपंच संतोष गव्हाणे, मा. उपसरपंच भाऊसाहेब होरे यांच्या मार्गदर्शनाखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी संतोष मोरे, संतोष गव्हाणे, भाऊसाहेब होरे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी हिरामण खेसे, विलास गावडे, अमोल ओव्हाळ, संतोष सातपुते, हारून शेख, संतोष सातपुते, पांडुरंग दुडे, संतोष लोणकर, रोहिदास कान्हूरकर, शंकर बोत्रे व दावडी गावचे ग्रामस्थ, गणपती मंडळांचे अध्यक्ष, कार्यकर्ते उपस्थित होते. ही बैठक यशस्वी रित्या पार पाडल्याबद्दल दावडी विभागाचे बिट अंमलदार पोलीस हवालदार संतोष मोरे, संजय रेपाळे यांचा सन्मान पोलीस पाटील आत्माराम डुंबरे यांच्या हस्ते करण्यात आला.
—-
महाबुलेटीन न्यूज l किशोर कराळे मुंबई, दि. ७: पुणे-नाशिक आणि नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गांवर मोठ्या प्रमाणात…
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर पुणे : हडपसर ते यवत आणि तळेगाव-चाकण शिक्रापूर महामार्गाच्या रुंदीकरणासाठी…
महाबुलेटीन न्यूज महाळुंगे ( चाकण एमआयडीसी ) : एक वर्षापासुन पाहीजे असलेल्या आरोपी कडुन १…
महाबुलेटीन न्यूज | आनंद कांबळे जुन्नर : पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील दुर्गावाडी परिसरात एक धक्कादायक…
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर चाकण ( पुणे ) : महाराष्ट्र हे उद्योगांना प्रोत्साहन देणारे…
महाबुलेटीन न्यूज | राजगुरूनगर खेड कृषी उत्पन्न बाजार समिती सेवानिवृत्त सचिव सतीश चांभारे यांची खेड…
This website uses cookies.