महाबुलेटीन न्यूज
यवत : पुणे जिल्हा पत्रकार संघ संलग्न दौंड तालुका पत्रकार संघाची आज द्विवार्षिक निवडणूक प्रक्रिया बिनविरोध पार पडली.
१८ ऑक्टोबर २०२० ते १७ ऑक्टोबर २०२२ या दोन वर्षाच्या मुदतीसाठी घेण्यात आलेल्या कार्यकारिणीच्या अकरा जागांसाठी प्रत्येकी एक असे अकराच अर्ज दाखल झाल्यामुळे निवडणूक बिनविरोध झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी सुनिल जगताप यांनी जाहीर केले. यावेळी अनिल वडघुले यांनी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले.
नूतन पदाधिकारी व कार्यकारिणी सदस्य पुढील प्रमाणे :-
अध्यक्ष रविंद्र अशोक खोरकर, उपाध्यक्ष राजू दत्तात्रय जगदाळे, सरचिटणीस (सचिव) संदिप दत्तात्रय नवले, कोषाध्यक्ष (खजिनदार) संतोष शिवाजी जगताप, सहसचिव बापू विजय नवले, सहखजिनदार रामदास सुरेश डोंबे, तर कार्यकारिणी सदस्यपदी रमेश बाबुराव वत्रे, दीपक हरिभाऊ देशमुख, गणेश विलास चोपडे, प्रकाश रमेश शेलार व संतोष दामू काळे यांची बिनविरोध निवड झाली.
नवीन कार्यकारिणीचे मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख, परिषदेचे कार्याध्यक्ष शरदजी पाबळे, विभागीय सचिव बापूसाहेब गोरे , जिल्हाध्यक्ष सुनील लोणकर, निवडणूक निर्णय अधिकारी व जिल्हा समन्वयक सुनिल जगताप व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी व अध्यक्ष पिंपरी-चिंचवड पत्रकार संघ अनिल वडघुले आणि परिषद प्रतिनिधी एम. जी. शेलार यांनी अभिनंदन केले.
महाबुलेटीन न्यूज l किशोर कराळे मुंबई, दि. ७: पुणे-नाशिक आणि नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गांवर मोठ्या प्रमाणात…
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर पुणे : हडपसर ते यवत आणि तळेगाव-चाकण शिक्रापूर महामार्गाच्या रुंदीकरणासाठी…
महाबुलेटीन न्यूज महाळुंगे ( चाकण एमआयडीसी ) : एक वर्षापासुन पाहीजे असलेल्या आरोपी कडुन १…
महाबुलेटीन न्यूज | आनंद कांबळे जुन्नर : पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील दुर्गावाडी परिसरात एक धक्कादायक…
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर चाकण ( पुणे ) : महाराष्ट्र हे उद्योगांना प्रोत्साहन देणारे…
महाबुलेटीन न्यूज | राजगुरूनगर खेड कृषी उत्पन्न बाजार समिती सेवानिवृत्त सचिव सतीश चांभारे यांची खेड…
This website uses cookies.