कोरोना

महाबुलेटिन BREAKING : सिरम इन्स्टिट्यूट देणार कोविड वरील लस २२५ रुपयात

महाबुलेटिन न्यूज / विशेष प्रतिनिधी
पुणे : अवघ्या जगाचे कोरोना लसीकडे लक्ष लागले असताना पुण्याच्या ‘सिरम इन्स्टिट्यूट’ने सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या बिल गेट्स फाउंडेशन सोबत उत्पादन करण्यासाठी करार केला आहे. या करारामुळे भारत आणि जगातील अविकसित देशांसाठी या लशीचे १० कोटी डोस उत्पादित केले जाणार आहेत. ही लस भारतात २०२१ च्या सुरवातीला केवळ २२५ ते २५० रुपयांपर्यंत मिळण्याचा दावा कंपनीने केला आहे.

आपल्या परिसरातील ताज्या बातम्या जलद वाचण्यासाठी आजच साईट वर बेल 🔔 दाबून सबस्क्राईब करा

करोनाच्या संसर्गाला अटकाव करण्यासाठी जगभरात लशींवर संशोधन करण्यात येत आहे. काही लशींची चाचणी अंतिम टप्प्यात आली आहे. ऑक्सफोर्ड विद्यापीठाने विकसित केलेल्या करोना प्रतिबंधक लशीकडे जगभराचे लक्ष लागले आहे. त्यातच आता या लशीची किंमतही समोर आली आहे. कमी आणि मध्यम उत्पन्न असणाऱ्या देशांमध्ये ही लस प्रति डोस ३ डॉलर दराने उपलब्ध होणार असून भारतात एका डोसची किंमत २२५ रुपये इतकी असणार आहे.

करोनाला अटकाव करणारी लस गरीबांपर्यंत उपलब्ध करून देण्यासाठी बिल अॅण्ड मेलिंडा गेट्स फाउंडेशन आणि सीरम इन्स्टिट्यूट यांनी पुढाकार घेतला आहे. बिल अॅण्ड मेलिंडा गेट्स फाउंडेशनच्या पुढाकाराने ‘गावी’ ( GAVI) या संस्थेची स्थापना झाली असून जागतिक आरोग्य संघटनेचेही त्याला पाठबळ आहे. गावीच्या माध्यमातून लस विकसित झाल्यानंतर त्याचे जगभरात योग्य दरात आणि निष्पक्षपणाने वितरण करण्यात येणार आहे. ऑक्सफर्ड-AstaZeneca विकसित करत असलेली लस भारतात सीरम इन्स्टिट्यूट उत्पादन करणार आहे. सीरम ‘गावी’च्या माध्यमातून १० कोटी लस गरिबांना उपलब्ध करून देणार आहे. या लशीच्या एका डोसची किंमत २२५ रुपये असणार असल्याची घोषणा सीरम इन्स्टिट्यूटचे आदार पुनावाला यांनी केली आहे. करोना विषाणूच्या बचावापासून किमान दोन डोस घ्यावे लागणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. सध्या सुरू असलेल्या चाचणीमध्ये स्वयंसेवकांना एका महिनाभराच्या कालावधीत दोन डोस देण्यात आले आहेत.

सीरम इन्स्टिट्यूटने याआधीदेखील भारतात सर्वांना परवडेल अशी किंमत ठेवणार असल्याचे जाहीर केले होते. सीरम इन्स्टिट्यूटने ऑक्सफर्ड-AstaZeneca आणि अमेरिकेच्या Novavax कंपनीसोबत लशींबाबत करार केला आहे.
दरम्यान, जगभरातील लशींच्या समन्वयाचे काम करणाऱ्या ‘गावी वॅक्सीन अलायन्स’ने लशीच्या किंमती ठरवण्याबाबत पुढाकार घेतला आहे. जगभरात लशींचे वितरण योग्य पद्धतीने व्हावे यासाठी कोवॅक्स केंद्राचीही स्थापना करण्यात आली आहे. कोवॅक्स केंद्राचे सहप्रमुख आणि गावी वॅक्सीन अलायन्सचे सीईओ सेथ बर्कले यांनी करोना लशीची किंमत ४० डॉलर म्हणजे जवळपास तीन हजार रुपये ठेवणार असल्याची माहिती दिली. तर, गरीब देशांना यापेक्षाही कमी दरात लस देण्याबाबत विचार सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले. युरोपीयन संघाच्या सूत्रांच्या माहितीनुसार श्रीमंत देशांमध्ये ही लस ४० डॉलरमध्ये उपलब्ध होणार आहे.

admin

Recent Posts

पुणे-नाशिक व नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गांच्या दुरुस्तीची तातडीने आवश्यकता; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची केंद्रीय मंत्री नितीन गडकरींकडे पत्राद्वारे मागणी

महाबुलेटीन न्यूज l किशोर कराळे मुंबई, दि. ७: पुणे-नाशिक आणि नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गांवर मोठ्या प्रमाणात…

2 months ago

पुणे-रायगड-नगर-नाशिक जिल्ह्यासाठी GOOD NEWS..!

महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर पुणे : हडपसर ते यवत आणि‌ तळेगाव-चाकण शिक्रापूर महामार्गाच्या रुंदीकरणासाठी…

2 months ago

एक वर्षांपासून वाँटेड आरोपीस पिस्तूलसह अटक, गुन्हे शाखा युनिट तीनची कामगिरी

महाबुलेटीन न्यूज महाळुंगे ( चाकण एमआयडीसी ) : एक वर्षापासुन पाहीजे असलेल्या आरोपी कडुन १…

2 months ago

40 वर्षांच्या तलाठ्यासोबत 20 वर्षीय कॉलेज तरुणी आढळली मृतावस्थेत, पुणे जिल्ह्यातील घटना, कार अन् चपलेमुळे भयंकर प्रकार समोर

महाबुलेटीन न्यूज | आनंद कांबळे जुन्नर : पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील दुर्गावाडी परिसरात एक धक्कादायक…

2 months ago

खेड तालुका सहकारी खरेदी विक्री संघाचे संचालकपदी सतीश चांभारे यांची निवड

महाबुलेटीन न्यूज | राजगुरूनगर खेड कृषी उत्पन्न बाजार समिती सेवानिवृत्त सचिव सतीश चांभारे यांची खेड…

3 months ago

This website uses cookies.