महाबुलेटीन न्यूज नेटवर्क
पुणे : कोरोनाने अवघ्या पंधरा दिवसात एक संपूर्ण कुटुंब संपवलं आहे. पुण्यातील जाधव कुटुंबातील पाच जणांचा गेल्या 15 दिवसांत कोरोनाने मृत्यू झाला आहे. आई अलका जाधव, भाऊ रोहित जाधव, अतुल जाधव आणि बहीण वैशाली गायकवाड यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. पूजेच्या निमित्ताने हे कुटुंब एकत्र आलं होतं. पूजेनंतर घरात कोरोनाचा संसर्ग झाला. त्यानंतर एकामागोमाग एक अशा पाच जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. यामुळे जाधव कुटुंबच संपलं. ( 5 members from same family died due to coronavirus at Pune Maharashtra )
एकाच कुटुंबातील पाच जणांचा कोरोनाने मृत्यू झाल्याने परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे. अवघ्या 15 दिवसात संपूर्ण कुटुंबच्या कुटुंब मृत्यूमुखी पडल्याने, कोरोनाचं भयाण रुप समोर येत आहे.
● पूजेच्या निमित्ताने एकत्र
——————————
जाधव कुटुंबीयांनी काही दिवसांपूर्वी घरात पूजेचं आयोजन केलं होतं. या पूजेच्या निमित्ताने घरातील सर्वजण एकत्र आले होते. एकाच कुटुंबातील सर्वजण असल्याने ते काहीसे निश्चिंत होते. मात्र एकामागोमाग एकाला कोरोनाने गाठलं. पुढे त्यांची प्रकृती बिघडत गेली आणि अवघ्या 15 दिवसात तब्बल 5 जणांचा मृत्यू झाला.
————————–
महाबुलेटीन न्यूज l किशोर कराळे मुंबई, दि. ७: पुणे-नाशिक आणि नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गांवर मोठ्या प्रमाणात…
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर पुणे : हडपसर ते यवत आणि तळेगाव-चाकण शिक्रापूर महामार्गाच्या रुंदीकरणासाठी…
महाबुलेटीन न्यूज महाळुंगे ( चाकण एमआयडीसी ) : एक वर्षापासुन पाहीजे असलेल्या आरोपी कडुन १…
महाबुलेटीन न्यूज | आनंद कांबळे जुन्नर : पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील दुर्गावाडी परिसरात एक धक्कादायक…
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर चाकण ( पुणे ) : महाराष्ट्र हे उद्योगांना प्रोत्साहन देणारे…
महाबुलेटीन न्यूज | राजगुरूनगर खेड कृषी उत्पन्न बाजार समिती सेवानिवृत्त सचिव सतीश चांभारे यांची खेड…
This website uses cookies.