महाबुलेटीन न्यूज
घोडेगाव (पुणे) : श्री क्षेत्र भीमाशंकर येथील महाशिवरात्रीनिमित्त होणारी यात्रा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आली आहे. या भागात पूर्णपणे संचारबंदी लागू असल्याने गुरुवारी (ता. ११) आणि शुक्रवारी (ता.१२) भाविकांनी गर्दी करू नये, असे आवाहन घोडेगाव पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक प्रदीप पवार यांनी केले आहे. येथे कडेकोट बंदोबस्तासाठी खेड आणि घोडेगाव पोलिस स्टेशन यांनी उपविभागीय पोलिस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली १० पोलिस अधिकारी तसेच १४० पोलिस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.
देवस्थान ट्रस्ट आणि पोलिस यांच्या सहाय्याने याठिकाणी कोणत्याही प्रकारचे सार्वजनिक कार्यक्रम होणार नाही. घोडेगाव पोलिस स्टेशन आणि खेड पोलीस स्टेशन यांनी चोख बंदोबस्तासाठी १० अधिकारी तसेच १४० पोलीस कर्मचारी तैनात केले आहेत. घोडेगाव पोलिस ठाण्याने डिंभे पाँईट, तळेघर, पालखेवाडी, भीमाशंकर एसटी स्टॅण्ड येथील महाद्वार कमान याठिकाणी कडक बंदोबस्त ठेवला आहे. हे बंदोबस्त टाळून जर भाविक दर्शनासाठी आलेच तर त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याची माहिती प्रदीप पवार यांनी दिली.
——–
महाबुलेटीन न्यूज l किशोर कराळे मुंबई, दि. ७: पुणे-नाशिक आणि नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गांवर मोठ्या प्रमाणात…
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर पुणे : हडपसर ते यवत आणि तळेगाव-चाकण शिक्रापूर महामार्गाच्या रुंदीकरणासाठी…
महाबुलेटीन न्यूज महाळुंगे ( चाकण एमआयडीसी ) : एक वर्षापासुन पाहीजे असलेल्या आरोपी कडुन १…
महाबुलेटीन न्यूज | आनंद कांबळे जुन्नर : पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील दुर्गावाडी परिसरात एक धक्कादायक…
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर चाकण ( पुणे ) : महाराष्ट्र हे उद्योगांना प्रोत्साहन देणारे…
महाबुलेटीन न्यूज | राजगुरूनगर खेड कृषी उत्पन्न बाजार समिती सेवानिवृत्त सचिव सतीश चांभारे यांची खेड…
This website uses cookies.