महाबुलेटीन न्यूज
आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : येथील इंद्रायणी नदी पात्रात परगावासह राज्यातून अस्थि विसर्जन व दशक्रिया विधीस येण्यास स्थानिक प्रशासनाने कोविड १९ रोखण्याच्या उपाययोजने अंतर्गत तसेच स्थानिक नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्याचे दृष्टीने आलेल्या मागणी प्रमाणे आळंदीत अस्थि विसर्जन करण्यास येण्यास बंदी घालण्यात आली आहे. अशी माहिती आळंदी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अंकुश जाधव व आळंदी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे यांनी दिली.
आळंदीसह सर्वत्र कोरोना रुग्ण संख्या वाढत असल्याने तसेच कोरोना संसर्ग होवू नये, यासाठी उपाय योजना करण्यासाठी आळंदीतील ग्रामस्थांनी इंद्रायणी नदी परिसरात अस्थि विसर्जनास सकाळी सहा ते रात्री सहा या वेळेत मोठी गर्दी होते. यावेळी मोठ्या प्रमाणात नातेवाईक येत असतात. यामुळे परिसरात साथ पसरू नये व आळंदीकर नागरिक, भाविकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी इंद्रायणी नदीवर अस्थि विसर्जनास होणारी गर्दी कमी करण्याची मागणी झाल्याने प्रशासनाने राज्यातून आळंदीत अस्थि विसर्जनास बंदी घातली आहे. यामुळे आळंदीला बाहेर गावावरून कोणीही अस्थि विसर्जनास येवू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.
हा बंदी आदेश पुढील आदेश होई पर्यन्त आळंदी नगरपरिषद हद्दीतील इंद्रायणी नदी तीरावर आळंदी शहरा बाहेरून अस्थि विसर्जनास येणा-या नागरिकांना ( स्थानिक वगळून ) बंदी घालण्यात आली आहे. या आदेशाचा भंग केल्यास भारतीय साथ रोग नियंत्रण व आपत्ती व्यवस्थापन अधिनियमा नुसार कारवाई करण्यात येणार असल्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे, आळंदी मुख्याधिकारी अंकुश जाधव यांनी सांगितले आहे.
———————-
मंगळवार, २१ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🌾 निवृत्त…
सोमवार, २० एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 सिद्धेश्वर…
रविवार, १९ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 खेडमध्ये…
शनिवार, १८ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🏛️ आमदार…
शुक्रवार, १७ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 पतसंस्था…
मंगळवार, १४ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 पतसंस्था…
This website uses cookies.