महाबुलेटीन न्यूज / प्रतिनिधी
इंदापूर : कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर कोरोना योध्दयांच्या हस्ते स्वातंत्र्यदिनाचे ध्वजारोहण करण्याचा पायंडा इंदापूरातील शैक्षणिक संस्थांनी पाडला.
कोरोना योध्दा डॉ. श्रध्दा काळे यांच्या हस्ते येथील राधिका माध्यमिक विद्यालयाचे ध्वजारोहण करण्यात आले. कोविड योद्धा गफूरभाई सय्यद यांच्या हस्ते कालठण नं.१ येथील जिजाऊ इन्स्टिट्यूटचा ध्वजारोहण समारंभ संपन्न झाला.
सय्यद व डॉ. काळे यांनी राष्ट्र सेवा दलाच्या माध्यमातून लॉकडाऊनच्या कालावधीत मोफत फिरती रुग्णसेवा केली आहे. कोरोनामुळे मरण पावलेल्या रुग्णावर अंत्यसंस्कार करण्यासाठी त्याचे नातेवाईक धजावत नसताना जोखीम पत्करुन सय्यद यांनी ते ही काम केले होते. त्यांच्या कार्याचा या कार्यक्रमाद्वारे यथोचित सन्मान झाला आहे, अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.
——-
बुधवार, २२ जुलै २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 5 बातम्या 💧 अतिवृष्टी…
रविवार, १९ जुलै २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ पुरंदर…
शुक्रवार, १७ जुलै २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ तीन…
बुधवार, १५ जुलै २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 खेड…
सोमवार, १३ जुलै २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 पंढरीच्या…
शनिवार, ११ जुलै २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 मोशी…
This website uses cookies.