कोरोना

कोरोना योध्दा प्रदीप गारटकरांचे जल्लोषात स्वागत

कोरोना योध्दा प्रदीप गारटकरांचे जल्लोषात स्वागत

महाबुलेटीन न्यूज : शैलेश काटे
इंदापूर : कोरोनावर मात करुन घरी परतलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर व त्यांच्या पत्नी अनुराधा गारटकर यांचे इंदापूरात त्यांच्या समर्थकांनी पुष्पवृष्टी करत,फटाक्यांच्या आतिषबाजीत स्वागत केले.

कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर गारटकर दांपत्यावर पुण्यात उपचार सुरु होते. उपचारा दरम्यान त्यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली. तसा संदेश त्यांनी काल सोशल मिडियावर टाकला. आपण परतत आहोत. खबरदारी म्हणून पुढील महीनाभर घरीच विश्रांती घेणार आहोत, असे त्यांनी त्या संदेशात स्पष्ट केले होते. हा संदेश आल्यानंतर त्यांचे समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.

गारटकर सपत्निक इंदापूरात आल्यानंतर त्यांच्या समर्थकांकडून त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. कोरोनाची साथ सुरु झाल्यानंतर गारटकर सर्वसामान्यांसाठी कीटवाटप, वैद्यकीय मदत यासारखे उपक्रम राबवत होते. त्यांच्या कार्यामुळे त्यांना रोटरी क्लबने कोरोना योध्दा पुरस्कार देवून सन्मानित केले होते. त्यानंतर कोरोनाची लागण झाल्यावर त्यांनी त्याच्यावर मात करुन आपण कोरोना योध्दा असल्याचे सिध्द केले, अशी त्यांच्या समर्थकांची सामुहिक प्रतिक्रिया होती.
——-

 

MahaBulletin Team

Recent Posts

MahaBulletin — 26 Jul 2026

शनिवार, २५ जुलै २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 💧 खेडमध्ये…

2 hours ago

MahaBulletin — 23 Jul 2026

बुधवार, २२ जुलै २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 5 बातम्या 💧 अतिवृष्टी…

3 days ago

MahaBulletin — 20 Jul 2026

रविवार, १९ जुलै २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ पुरंदर…

6 days ago

MahaBulletin — 18 Jul 2026

शुक्रवार, १७ जुलै २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ तीन…

1 week ago

MahaBulletin — 17 Jul 2026

बुधवार, १५ जुलै २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 खेड…

1 week ago

MahaBulletin — 14 Jul 2026

सोमवार, १३ जुलै २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 पंढरीच्या…

2 weeks ago

This website uses cookies.