महाबुलेटीन न्यूज
चाकण : कोरोनाच्या (Corona) काळात डॉक्टर आणि आरोग्य कर्मचारी जीवाची बाजी लावून काम करत आहे. पण, अशाही परिस्थितीत खासगी हॉस्पिटलकडून (Covid Hospital) रुग्णांची आर्थिक लूट होत असल्याच्या घटना वाढल्या आहे. अखेर राज्य सरकारने दणका देत जास्तीचे बिल आकारणी वसूल करणाऱ्या व बिलासाठी तगादा लावणाऱ्या पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय हद्दीतील चाकण येथील (Chakan) क्रिटिकेअर या खासगी हॉस्पिटल आणि त्यांच्या चार डॉक्टरांवर (Doctor) फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
कोरोनाबाधित रुग्णांवर उपचारासाठी राज्य सरकारने दराबाबत नियमावली जाहीर केली आहे. पण तरी सुद्धा खासगी रुग्णालयांकडून लाखो रुपयांची लूट सुरूच आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार व आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी रुग्णालयांचे ऑडिट करून, अवाजवी बिल आकारणी केली असल्यास बिल तपासून गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुणे जिल्ह्यातील ही पहिलीच घटना आहे.
चाकण ( ता.खेड ) येथील क्रीटीकेयर हॉस्पिटलमध्ये (Chakan Criticare Hospital) काही दिवसांपूर्वी विजय पोखरकर यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यांचा कोरोनाचा रिपोर्ट हा पॉझिटिव्ह आला होता. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या उपचाराबद्दल हॉस्पिटल प्रशासनाने पुष्पा विजय पोखरकर यांना 2 लाख 53 हजार रुपयांचे बिल आकारले होते. त्यामुळे इतकी मोठी रक्कम भरण्याबाबत पुष्पा पोखरकर यांनी हॉस्पिटलकडे विचारणा केली, पण हे बिल भरावेच लागेल, असं सांगण्यात आले.
विशेष म्हणजे, शासनाने निश्चित केलेल्या दरांपेक्षा अवाजवी दर आकारून 2 लाख 53 हजारांची रक्कम रुग्णाला भरण्यास सांगितली होती. या प्रकरणी हॉस्पिटल प्रशासनाला रक्कम शासकीय नियमाप्रमाणे द्यावी, अशी सूचना करण्यात आली होती. वारंवार सूचना करूनही हॉस्पिटल प्रशासनाकडून कोणतीची दखल घेण्यात आली नाही.
अखेर या प्रकरणी चाकण क्रीटीकेयर हॉस्पिटलला दणका देत संचालक डॉ. राजेश घाटकर आणि डॉ. स्मिता घाटकर यांच्यासह डॉ. राहुल सोनवणे आणि डॉ. सीमा गवळी विरुद्ध फसवणुकीचा गुन्हे दाखल करण्यात आले आहे. खासगी रुग्णालयातील बिलांची तपासणी केली जाणार अशी घोषणा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केली होती. त्यानंतर पुणे जिल्ह्यातील हा पहिलाच गुन्हा दाखल झाला आहे. त्यामुळे खासगी हॉस्पिटलच्या मनमानी कारभाराला चांगलाच झटका बसला आहे.
०००००
महाबुलेटीन न्यूज l किशोर कराळे मुंबई, दि. ७: पुणे-नाशिक आणि नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गांवर मोठ्या प्रमाणात…
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर पुणे : हडपसर ते यवत आणि तळेगाव-चाकण शिक्रापूर महामार्गाच्या रुंदीकरणासाठी…
महाबुलेटीन न्यूज महाळुंगे ( चाकण एमआयडीसी ) : एक वर्षापासुन पाहीजे असलेल्या आरोपी कडुन १…
महाबुलेटीन न्यूज | आनंद कांबळे जुन्नर : पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील दुर्गावाडी परिसरात एक धक्कादायक…
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर चाकण ( पुणे ) : महाराष्ट्र हे उद्योगांना प्रोत्साहन देणारे…
महाबुलेटीन न्यूज | राजगुरूनगर खेड कृषी उत्पन्न बाजार समिती सेवानिवृत्त सचिव सतीश चांभारे यांची खेड…
This website uses cookies.