महाबुलेटीन न्यूज
आळंदी / प्रतिनिधी : सोळु ग्रामपंचायत व ग्रामस्थांनी कोरोनाचे पार्श्व्भूमीवर सोळुत राबविलेले आरोग्य विषयक उपाय योजना व सकारात्मक प्रभाव सोळुत दिसून आला. स्वच्छता, औषध फवारणी, कोरोंना संसर्ग तपासणी मोहीम आदि कार्यामुळे ग्रामपंचायत व ग्रामस्थांची साथ कौतुकास्पद असल्याचे पुणे जिल्हा परिषदेच्या सदस्या दीपाली काळे यांनी सांगितले .
माझे कुटुंब माझी जबाबदारी योजने अंतर्गत सोळु येथे कोरोंना तपासणी मोहीम आयोजित करण्यात आली होती.या प्रसंगी काळे बोलत होत्या. या प्रसंगी वैद्यकीय अधिकारी डॉ. इंदिरा पारखे, सहाय्यक आरोग्य अधिकारी ज्ञानेश्वर आढाव,मोहिनी साखरे,सरपंच कल्याणी ठाकुर,उपसरपंच अल्पेश कांबळे, युवराज ठाकुर,पूजा चौधरी,पूजा गोडसे,सावित्रा ठाकुर, गणेश गोडसे, विनोद ठाकुर, शशिकला ठाकुर, मनीषा गोडसे, ग्रामसेविका मोहिनी कडू पाटील आदींसह ग्रामस्था उपस्थित होते.
माझे कुटुंब माझी जबाबदारी या उपक्रमात सोळु येथे घरभेटीत आरोग्य तपासणी करण्यात आली. ६४९ कुटुंबांतून २ हजार ४९० ग्रामस्थांची या मोहिमेत तपासणी करण्यात आली. यात सर्व ग्रामस्थांचे रीपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. यावेळी कोरोंना होवू नये,गाव कोरोनामुक्त व्हावे यासाठी दक्षता घेण्याचे आवाहन जिल्हा परिषद सदस्या दीपाली काळे, सरपंच कल्याणी ठाकुर, डॉ.इंदिरा पारखे यांनी मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन विलास चौधरी यांनी केले. आभार ज्ञानेश्वर आढाव यांनी केले.
महाबुलेटीन न्यूज l किशोर कराळे मुंबई, दि. ७: पुणे-नाशिक आणि नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गांवर मोठ्या प्रमाणात…
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर पुणे : हडपसर ते यवत आणि तळेगाव-चाकण शिक्रापूर महामार्गाच्या रुंदीकरणासाठी…
महाबुलेटीन न्यूज महाळुंगे ( चाकण एमआयडीसी ) : एक वर्षापासुन पाहीजे असलेल्या आरोपी कडुन १…
महाबुलेटीन न्यूज | आनंद कांबळे जुन्नर : पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील दुर्गावाडी परिसरात एक धक्कादायक…
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर चाकण ( पुणे ) : महाराष्ट्र हे उद्योगांना प्रोत्साहन देणारे…
महाबुलेटीन न्यूज | राजगुरूनगर खेड कृषी उत्पन्न बाजार समिती सेवानिवृत्त सचिव सतीश चांभारे यांची खेड…
This website uses cookies.