कोरोना परिस्थिती नियंत्रणात आणण्याकरीता करण्यात येणाऱ्या उपाययोजनेसाठी लागणारी माहिती दररोज अद्यावत करा- विभागीय आयुक्त डॉ. दिपक म्हैसेकर

पुणे, दि.18 : कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यूदर कमी करण्याबरोबरच आपापल्या जिल्ह्यातील कोरोना परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी कराव्या लागणाऱ्या भविष्यकालीन उपाययोजनेच्या दृष्टीने संबंधित यंत्रणेने दररोज अचूक माहिती अद्यावत करावी, अशा सूचना विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिल्या.
कोरोना विषाणूबाबत विभागीय आढावा बैठक विभागीय आयुक्त डॉ. दिपक म्हैसेकर यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय आयुक्त कार्यालयात दृकश्राव्य संवाद प्रणालीद्वारे पार पडली. या बैठकीला उपायुक्त संजयसिंह चव्हाण, प्रताप जाधव, नैना बोंदार्डे, साधना सावरकर, त्रिगुन कुलकर्णी, जयंत पिंपळगावकर, पी.बी.पाटील आदि उपस्थित होते.
पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम, साताऱ्याचे जिल्हाधिकारी शेखर सिंह, सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर, सांगलीचे जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी, कोल्हापूरचे जिल्हाधिकारी दौलत देसाई, कोल्हापूर महानगरपालिकाचे आयुक्त डॉ. मल्लीनाथ कलशेट्टी, सोलापूर महानगरपालिकाचे आयुक्त पी. शिव शंकर, पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, कोल्हापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, पुणे महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील, उपायुक्त संजयसिंह चव्हाण, प्रताप जाधव, वैंशंपायन स्मृती वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अशोक नांदापूरकर, पुणे महापालिकेचे आरोग्य प्रमुख डॉ. रामचंद्र हंकारे यांनी दृकश्राव्य प्रणाली द्वारे संवाद साधला.
विभागीय आयुक्त डॉ. म्हैसेकर म्हणाले, संबंधित यंत्रणेनी आपापल्या जिल्ह्यातील बाधित रुग्ण, सक्रीय रुग्ण, गंभीर रुग्ण, बरे झालेले रुग्णण, कोमोर्बिडिटी रुग्ण, मृत्यू झालेले रुग्ण तसेच शासकीय तसेच खासगी रुग्णालयातील खाटा, पीपीई किट, व्हेंटीलेटर, ऑक्सीजनयुक्त खाटांची संख्या इत्यादी नोंदी दैनंदिन अद्यावयत कराव्यात, मृत्यदर शुन्यावर आणण्यासाठी जे जे शक्य होईल अशा सर्व आवश्यक त्या उपाययोजना करा, कोरोना बाधित रुग्णांचे मृत्यूदर कमी करण्यासाठी संबधित जिल्हाधिकारी, महानगरपालिका आयुक्त व जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी संबंधित यंत्रणेशी समन्वय साधून एकत्रित नियोजन करावे, कोरोना बाधित रुग्णांचे प्रमाण का वाढत आहे यांचा बारकाईने अभ्यास करुन परिस्थिती नियत्रंणात आणावी, प्रतिबंधित क्षेत्रातील परिस्थिती प्राधान्याने हाताळा, मान्सूनमध्ये कोरोना विषाणूचा प्रसार होण्याची शक्यता लक्षात घेऊन त्यानुसार तयारी करा, ग्रामीण तसेच नागरी भागात जास्तीत सर्व्हेक्षण करण्याच्या दृष्टीने कार्यवाही करा. मागील 24 तासात किती रुग्ण वाढले यांचा विचार करुन नियोजन करा, खासगी रुग्णालयातील खाटा, पीपीई किट, व्हेंटीलेटर,ऑक्सीजनयुक्त खाटा इत्यादी बाबी विचारात घ्याव्यात, कोरोना विषाणूचे तात्काळ निदान करण्याच्या दृष्टिकोनातून जास्तीत जास्त चाचण्या करण्यावर भर द्यावा, अशा सूचनाही विभागीय आयुक्त डॉ. म्हैसेकर यांनी दिल्या.
या बैठकीत सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी आपापल्या जिल्ह्यातील कोरोना‍ विषाणूच्या अनुषंगाने सविस्तर माहिती दिली. त्याच बरोबर कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्ह्यात करीत असलेल्या उपाययोजनांचीही माहिती दिली.

 

admin

Recent Posts

MahaBulletin — 15 Jun 2026

रविवार, १४ जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ भीमाशंकर…

2 days ago

MahaBulletin — 14 Jun 2026

शनिवार, १३ जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 पुण्यात…

3 days ago

MahaBulletin — 13 Jun 2026

शुक्रवार, १२ जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 गायरान…

4 days ago

MahaBulletin — 12 Jun 2026

गुरुवार, ११ जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 विषारी…

5 days ago

MahaBulletin — 11 Jun 2026

बुधवार, १० जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 दारूकांडानंतर…

6 days ago

MahaBulletin — 10 Jun 2026

सोमवार, ८ जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 गुन्हेगारीवर…

1 week ago

This website uses cookies.