कोरोना

कंटेनमेंट झोनमध्ये दुकाने चालू ठेवणाऱ्या पाच जणांवर पोलिसांची कारवाई

 

नियमाचे पालन न करणाऱ्यांवर होणार कायदेशीर कारवाई : सहा. पो. निरीक्षक दत्तात्रय गुंड

 

महाबुलेटीन न्यूज : किरण वाजगे
नारायणगाव : वारूळवाडी व नारायणगाव परिसर प्रतिबंधित क्षेत्र जाहीर झाला असताना येथे दुकाने चालू ठेवून सोशल डिस्टंसिंगचे पालन न करणाऱ्या तसेच गर्दी करून मास्क न लावणाऱ्या दुकानदारांवर नारायणगाव पोलिसांनी आज गुन्हा दाखल केला असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय गुंड यांनी दिली.

याबाबत अधिक माहिती अशी की, आज दिवसभर पेट्रोलिंग करत असताना पोलिसांना नारायणगावातील विविध भागातील दुकानांमध्ये मास्क न लावता तसेच पाच व पाचपेक्षा अधिक ग्राहकांची उपस्थिती असणे, आरोग्याची कोणतीही काळजी न घेणे, सॅनिटायझर न ठेवता व हातपाय धुण्यासाठी पाण्याची व्यवस्था न केल्याचे आढळल्याने आज पाच दुकानदारांवर कारवाई करण्यात आली.

त्यानुसार पुणे-नाशिक महामार्गावरील हॉटेल स्वामी समर्थचे अनील गबाजी यादव, हॉटेल महालक्ष्मीचे गणेश अशोक पाटे, नारायणगाव येथील सिद्धेश्वर ट्रेडर्सचे अजित दशरथ मोरे, मुकेश ताजाराम देवासी व मोहन दळवी यांच्यावर प्रचलित कायद्यानुसार आज गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस फौजदार कैलास ढमाले, सहाय्यक पोलीस फौजदार केंगले, पोलीस नाईक जढर, पोलीस नाईक जांभळे हे करीत आहेत.

नारायणगाव व वारूळवाडी मध्ये कंटेनमेंट झोन जाहीर झाला असताना नारायणगाव पासून पाच किलोमीटर चा परिसर बफर झोन म्हणून प्रांताधिकारी सारंग कोडोलकर यांनी घोषित केला आहे.

ज्या दुकानांना प्रांताधिकाऱ्यांनी परवानगी दिली आहे. त्या दुकानांमध्ये काम करणाऱ्या कामगारांनी तसेच ग्राहकांनी व मालकांनी मास्क लावणे, सॅनिटायझर ठेवणे, हात पाय धुण्यासाठी पाणी ठेवणे या सूचनांचे पालन करावे. अन्यथा त्यांच्यावर कोविड – १९ प्रचलित कायद्यानुसार कायदेशीर कारवाई केली जाईल, अशी माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय गुंड यांनी दिली आहे.
——–

MahaBulletin Team

Recent Posts

MahaBulletin — 19 Mar 2026

बुधवार, १८ मार्च २०२६ 📍 महाराष्ट्र आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🏛️ पुणे जिल्हा परिषद…

23 hours ago

MahaBulletin — 18 Mar 2026

मंगळवार, १७ मार्च २०२६ 📍 महाराष्ट्र आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकणमध्ये भटक्या कुत्र्यांचा…

2 days ago

MahaBulletin — 17 Mar 2026

पुणे जिल्ह्यात भटक्या कुत्र्यांचा वाढता धोका पुन्हा एकदा समोर आला आहे, चाकण येथे एका 32…

3 days ago

पुणे-नाशिक व नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गांच्या दुरुस्तीची तातडीने आवश्यकता; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची केंद्रीय मंत्री नितीन गडकरींकडे पत्राद्वारे मागणी

महाबुलेटीन न्यूज l किशोर कराळे मुंबई, दि. ७: पुणे-नाशिक आणि नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गांवर मोठ्या प्रमाणात…

9 months ago

पुणे-रायगड-नगर-नाशिक जिल्ह्यासाठी GOOD NEWS..!

महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर पुणे : हडपसर ते यवत आणि‌ तळेगाव-चाकण शिक्रापूर महामार्गाच्या रुंदीकरणासाठी…

9 months ago

एक वर्षांपासून वाँटेड आरोपीस पिस्तूलसह अटक, गुन्हे शाखा युनिट तीनची कामगिरी

महाबुलेटीन न्यूज महाळुंगे ( चाकण एमआयडीसी ) : एक वर्षापासुन पाहीजे असलेल्या आरोपी कडुन १…

9 months ago

This website uses cookies.