राष्ट्रीय

कर्नल ते लॉर्ड ऑफ लॉर्ड्स…

महाबुलेटिन न्यूज नेटवर्क । शिवाजी आतकरी
आमच्या पिढीने कर्नल सी के नायडू यांना खेळताना पाहिले नाही. आमच्या पिढीने डेनिस कॉम्प्टन, सर लेन हटन, सर डॉन ब्रॅडमन, जेफ्री बायकॉट यांनाही खेळताना पाहिले नाही. पण, आमच्या पिढीने दिलीप वेंगसरकर, सुनील गावस्कर, महंमद अझरुद्दीन, राहुल द्रविड या भारतीयांना मैदान मारताना पाहिलंय. आपल्या सहजसुंदर शैलीने आणि अप्रतिम स्टान्सने या खेळाडूंनी क्रिकेटचे सौंदर्य वाढवले आणि अखिल क्रिकेट विश्वाला नजाकतदार फलंदाजीचा मनमुराद आनंद लुटू दिला. हे सर्व मांडायचे निमित्त म्हणजे आपल्या मराठमोळ्या आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट गाजविणाऱ्या दिलीप वेंगसरकर यांना बहुमानाचा सन्मान जाहीर झाला आहे. हा सन्मान आहे ‘हॉल ऑफ फेम…!

दिलीप बळवंत वेंगसरकर बस्स नाम ही काफी है….
इराणी ट्रॉफीत शेष भारत विरुद्ध खेळताना दिलीप वेंगसरकर या त्यावेळच्या नवख्या फलंदाजाने बेदी, प्रसन्ना, वेंकटराघवन या फिरकीच्या जादूगारांची अशी पिटाई केली की, क्रिकेट शौकिनांना दिलीप वेंगसरकर यांच्यात कर्नल नायडूंची लकब, शैली दिसली असावी. झालं! तेथून कर्नल पदवी आपसूक बहाल झाली आणि भारतीयांच्या दिलीप वेंगसरकर यांच्याकडून अपेक्षा आणि आशाही उंचावल्या. पुढे क्रिकेटची पंढरी असणाऱ्या लॉर्ड्सवर गोऱ्यांसमोर लागोपाठ तीन शतके ठोकून फलंदाजीची सहजसुंदर शैली अशी असते, ही मिसाल त्यांनी दाखवून दिली.

खरे तर दिलीप वेंगसरकर यांच्याविषयी क्रिकेटविश्वाला चांगले माहीत आहे. माजी कर्णधार राहिलेले दिलीप सर भारतीय क्रिकेट निवड समितीवर असताना क्रिकेटची गुणवत्ता हेरताना विराट कोहलीसारखा खेळाडू त्यांनी हेरला. त्यांचे क्रिकेट आणि व्यक्तिमत्व काही शब्दात बसवणे हा त्यांच्यावर अन्याय होईल. जसे की त्यांच्यासारखे खेळाडू आकडेवारीच्या मोजपट्टीवर आपण मोजूच शकत नाही. काही खेळाडू असे असतात की, त्यांच्या क्षमतेपेक्षा त्यांच्या वाट्याला नेहमी कमी येते. हा तसा दैवदुर्विलास म्हणावा लागेल.

महाराष्ट्रातील राजापूर येथे ६ एप्रिल १९५६ ही त्यांच्या जन्माबद्दल माहिती. न्यूझीलंड विरुद्ध ऑकलन्ड येथे विसाव्या वर्षी कसोटी पदार्पण. त्याचवर्षी एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण. १९८५ ते १९८७ हा त्यांच्यासाठी सुवर्णकाळ होता. या काळात त्यांनी पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, वेस्ट इंडीज, श्रीलंका यांच्याविरूध्द शतके झळकावली. विशेष म्हणजे या सर्वच संघांकडे लक्षवेधक तेज तर्रार जलदगती गोलंदाज होते. जोएल गार्नर, मायकेल होल्डिंग, अँडी रोबर्ट्स, माल्कम मार्शल, वेस्ट इंडिजचा बिशप अशा कर्दनकाळ गोलंदाजांविरुद्ध खेळताना त्यांनी सहा शतके ठोकली आहेत. लॉर्ड्सवर जशी तीन शतके तशीच दिल्लीच्या फिरोजशहा कोटलावर चार शतके त्यांनी ठोकलीत.

१९८७ मध्ये विस्डेनचा सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटू पुरस्कार, १९८७ मध्ये भारतीय संघाचे कर्णधार व भारत सरकारचा पद्मभूषण पुरस्कार, २००६ मध्ये भारतीय क्रिकेट निवड समितीचे अध्यक्षपद आणि आता ‘हॉल ऑफ फेम’ हा मानाचा सन्मान. एक दिग्गज खेळाडू म्हणून एकूणच पुरस्कारात व सन्मानात काही रितेपणा राहिलाच आहे. एखाद्याच्या वाट्याला कमी येते. पण व्यक्ती म्हणून मी दिलीप सरांना जवळून पाहिलंय. उमदा आणि देखणा माणूस तितक्याच सहजतेने संवाद साधतो. तो साधेपणा आणि विचारपूस करण्याची पद्धत अधिक भावते. अनेकदा भेटीचा योग आला पण इतका मोठा माणूस मात्र साधेपणाचे पैलू अधिक अधोरेखित झाले. क्रिकेटबद्दल तळमळ, अनुभव, क्रिकेटसंदर्भात विचारांची व्यापकता लक्षात घेतल्यास भारतीय क्रिकेटला अशा खेळाडूचा मोठा फायदा होऊ शकतो. किंबहुना क्रिकेटला अशा अनुभवी खेळाडूमुळे नवीन आयाम मिळू शकतो. तूर्तास ‘हॉल ऑफ फेम सन्मान’ दिलीप वेंगसरकर यांना मिळाला त्याबद्दल त्यांचे अभिनंदन….

 

दिलीप वेंगसरकर यांची कारकीर्द

# कसोटी
सामने – ११६
धावा – ६८६८
सरासरी – ४२.१३
सर्वोत्तम – १६६
१००/५० – १७/३५
झेल – ७८

# वन डे
सामने – १२९
धावा – ३५०८
सरासरी – ३४.७३
सर्वोत्तम – १०५
१००/५० – १/२३
झेल ३७
———–

MahaBulletin Team

Recent Posts

पुणे-नाशिक व नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गांच्या दुरुस्तीची तातडीने आवश्यकता; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची केंद्रीय मंत्री नितीन गडकरींकडे पत्राद्वारे मागणी

महाबुलेटीन न्यूज l किशोर कराळे मुंबई, दि. ७: पुणे-नाशिक आणि नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गांवर मोठ्या प्रमाणात…

2 months ago

पुणे-रायगड-नगर-नाशिक जिल्ह्यासाठी GOOD NEWS..!

महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर पुणे : हडपसर ते यवत आणि‌ तळेगाव-चाकण शिक्रापूर महामार्गाच्या रुंदीकरणासाठी…

2 months ago

एक वर्षांपासून वाँटेड आरोपीस पिस्तूलसह अटक, गुन्हे शाखा युनिट तीनची कामगिरी

महाबुलेटीन न्यूज महाळुंगे ( चाकण एमआयडीसी ) : एक वर्षापासुन पाहीजे असलेल्या आरोपी कडुन १…

2 months ago

40 वर्षांच्या तलाठ्यासोबत 20 वर्षीय कॉलेज तरुणी आढळली मृतावस्थेत, पुणे जिल्ह्यातील घटना, कार अन् चपलेमुळे भयंकर प्रकार समोर

महाबुलेटीन न्यूज | आनंद कांबळे जुन्नर : पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील दुर्गावाडी परिसरात एक धक्कादायक…

2 months ago

खेड तालुका सहकारी खरेदी विक्री संघाचे संचालकपदी सतीश चांभारे यांची निवड

महाबुलेटीन न्यूज | राजगुरूनगर खेड कृषी उत्पन्न बाजार समिती सेवानिवृत्त सचिव सतीश चांभारे यांची खेड…

3 months ago

This website uses cookies.