अध्यात्मिक

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या पिंपरी-चिंचवड दौऱ्यावर, भंडारा डोंगरावरील मंदिराची करणार पाहणी

महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर

पिंपरी : श्री क्षेत्र भंडारा डोंगरावर माघ शुद्ध दशमी व जगदगुरू श्री संत तुकाराम महाराजांचा जन्मदिवस वसंतपंचमीच्या निमित्ताने सुरु असणा-या अखंड हरीनाम सप्ताहास व गाथा पारायण सोहळ्यास राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या (रविवारी) सायंकाळी भेट देणार आहेत. डोंगरावरील मंदिराच्या कामाची पाहणी करणार आहेत. तीर्थक्षेत्र देहूगावात तुकाराम महाराजांचे दर्शन घेऊन मुख्यमंत्री भंडारा डोंगरावर जाणार आहेत. याबाबतची माहिती मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी दिली.तर इंद्रायणी थडीच्या समारोप कार्यक्रमास सायंकाळी पावणेसहा वाजता मुख्यमंत्री उपस्थित राहणार असल्याचे आमदार महेश लांडगे यांनी सांगितले.

श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर ट्रस्टच्या वतीने भंडारा डोंगरावर श्री संत तुकाराम महाराजांचे जागतिक किर्तीचे भव्यदिव्य मंदिर साकारले जात आहे. तुकाराम महाराजांचे सर्वात मोठे शिल्प उभारले जाणार असून मंदिराचे काम वेगात सुरू आहे. सुमारे 125 कोटींहून अधिक रुपये खर्च करून मंदिर उभारण्यात येत आहे. मंदिराचे काम 30 ते 35 टक्के काम पूर्ण झाले आहे. तुकोबारायांच्या आकाश एवढ्या कार्याला साजेसे भव्य-दिव्य मंदिर व्हावे, ही सकल वारकरी सांप्रदाय व तुकोबारायांवर नितांत श्रद्धा असणा-या प्रत्येक भाविकांचे स्वप्न प्रत्यक्षात साकार होत आहे.

जगदगुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांनी श्री क्षेत्र भंडारा डोंगरावर गाथा लिहिली होती. तुकाराम महाराजांची चिंतन भूमी असणा-या या पवित्र ठिकाणी विठ्ठल रूक्मिणी मंदिर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष बाळासाहेब काशिद यांच्या पुढाकाराने मंदिर उभारले जात आहे. या मंदिराच्या कामकाजाची पाहणी करावी, अशी विनंती खासदार श्रीरंग बारणे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली होती. त्यानुसार मुख्यमंत्री शिंदे हे उद्या भंडारा डोंगराला भेट देणार आहेत. मंदिराच्या कामाची पाहणी करणार आहेत.

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात प्रस्तावित केलेला 110 मीटर रुंद रिंगरोड मावळ तालुक्यातील श्री क्षेत्र भंडारा डोंगराला भेदून किंवा बोगदा पाडून जात होता. डोंगराला बोगदा करण्यास वारक-यांचा, संस्थानचा तीव्र विरोध होता.

वारक-यांच्या भावना लक्षात घेता भंडारा डोंगराला भेदून जाणा-या रिंगरोडच्या रेखांकनात बदल करण्याची आग्रही मागणी खासदार श्रीरंग बारणे यांनी राज्य सरकारकडे केली होती. त्याबाबत संस्थांनच्या पदाधिका-यांना सोबत घेवून शासनाकडे पाठपुरावा केला. त्याला सकारात्मक प्रतिसाद देत शासनाने रिंगरोड भंडारा डोंगराच्या बाजूने घेण्याचा निर्णय घेतला. डोंगराला भेदून रिंगरोड जाणार नाही. त्यामुळे वारकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे धार्मिक क्षेत्राच्या बाबतीत सकारात्मक राहिले आहेत.

MahaBulletin

Recent Posts

पुणे-नाशिक व नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गांच्या दुरुस्तीची तातडीने आवश्यकता; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची केंद्रीय मंत्री नितीन गडकरींकडे पत्राद्वारे मागणी

महाबुलेटीन न्यूज l किशोर कराळे मुंबई, दि. ७: पुणे-नाशिक आणि नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गांवर मोठ्या प्रमाणात…

2 months ago

पुणे-रायगड-नगर-नाशिक जिल्ह्यासाठी GOOD NEWS..!

महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर पुणे : हडपसर ते यवत आणि‌ तळेगाव-चाकण शिक्रापूर महामार्गाच्या रुंदीकरणासाठी…

2 months ago

एक वर्षांपासून वाँटेड आरोपीस पिस्तूलसह अटक, गुन्हे शाखा युनिट तीनची कामगिरी

महाबुलेटीन न्यूज महाळुंगे ( चाकण एमआयडीसी ) : एक वर्षापासुन पाहीजे असलेल्या आरोपी कडुन १…

2 months ago

40 वर्षांच्या तलाठ्यासोबत 20 वर्षीय कॉलेज तरुणी आढळली मृतावस्थेत, पुणे जिल्ह्यातील घटना, कार अन् चपलेमुळे भयंकर प्रकार समोर

महाबुलेटीन न्यूज | आनंद कांबळे जुन्नर : पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील दुर्गावाडी परिसरात एक धक्कादायक…

2 months ago

खेड तालुका सहकारी खरेदी विक्री संघाचे संचालकपदी सतीश चांभारे यांची निवड

महाबुलेटीन न्यूज | राजगुरूनगर खेड कृषी उत्पन्न बाजार समिती सेवानिवृत्त सचिव सतीश चांभारे यांची खेड…

3 months ago

This website uses cookies.