गुन्हेगारी

सिनेस्टाईल पाठलाग करत सुमारे पाच लाख २० हजार रुपयांची दारू व मुद्देमाल जप्त

 

स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाची कारवाई

महाबुलेटीन न्यूज : प्रतिनिधी
नारायणगाव : पुणे जिल्हा स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या वतीने नारायणगाव खोडद रस्त्यावर एका कारचा सिनेस्टाईल पाठलाग करत सुमारे पाच लाख २० हजार रुपयांची दारू व मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी दिलेल्या अवैद्य धंद्यांवर कडक कारवाई करण्याच्या आदेशानुसार, स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे एक पथक मंगळवार दि.२७/१०/२०२० रोजी नारायणगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत पेट्रोलिंग करीत होते. यावेळी नारायणगाव-खोडद रस्त्याने एक स्विफ्ट डिझायर गाडी क्र. एम. एच. १२ एल. पी. ९९९६ ही भरधाव वेगाने व संशयास्पद रीत्या खोडद गावच्या दिशेने जाताना दिसली. त्यामुळे या गाडीचा पाठलाग करून हिवरे तर्फे नारायणगाव येथे गाडीला अडवून पथकाने त्यांच्याकडे विचारपूस करत गाडीची पाहणी केली असता, त्यामध्ये विनापरवाना व बेकायदेशीररित्या देशी-विदेशी दारूची वाहतुक करताना आढळल्याने तात्काळ दोन पंचांना बोलावून ४५ हजार ५०४ रुपये किंमतीची दारु व  ४ लाख ७५ हजार रुपये किंमतीची स्विफ्ट डिझायर कार असा एकुण ५ लाख २० हजार ५०४ रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. या घटनेतील आरोपी व मुद्देमाल नारायणगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला आहे. याबाबत पो. नाईक दिपक साबळे यांनी फिर्याद दिली आहे.

निलेश बबन पळसकर वय – ३६ वर्षे, रा. जांबुत ता. शिरूर, जि. पुणे व अरुण कुमार रामप्रसाद राय यादव वय- ३० वर्षे, सध्या राहणार जांबुत, ता. शिरूर, जि. पुणे, मुळ राहणार टूला मगलाहिया, मसरक पूर्व, ता. मसरक जि. छापरा, राज्य – बिहार अशी आरोपींची नावे आहेत.

या दोन्ही आरोपींविरुद्ध नारायणगाव पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा र. नं. ३५७/२०२० मुंबई दारूबंदी कायदा कलम ६५ (अ) (ई), ६७ (क) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र मांजरे,  पो.ना. दीपक साबळे, पो. हवालदार शरद बांबळे, पो. हवालदार शंकर जम यांचे पथकाने केली.

MahaBulletin Team

Recent Posts

खेड तालुका सहकारी खरेदी विक्री संघाचे संचालकपदी सतीश चांभारे यांची निवड

महाबुलेटीन न्यूज | राजगुरूनगर खेड कृषी उत्पन्न बाजार समिती सेवानिवृत्त सचिव सतीश चांभारे यांची खेड…

1 month ago

ज्ञानेश्वरी काव्यार्थ ग्रंथाचा प्रकाशन सोहळा संपन्न

महाबुलेटीन न्यूज l प्रसन्नकुमार देवकर चाकण : युगंधर पब्लिकेशन हाऊस, महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा चाकण,…

1 month ago

स्वच्छ, हरित व सुरक्षित वारीसाठी सूक्ष्म नियोजन करा-विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार विभागीय आयुक्तांकडून पालखी सोहळा पूर्वतयारीचा आढावा

महाबुलेटीन न्यूज l प्रसन्नकुमार देवकर पुणे, दि.१६ : पालखी सोहळ्यात वारकऱ्यांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून…

1 month ago

चाकण येथे कामगार महिलेवर बलात्कार, आरोपीस १२ तासात अटक

महाबुलेटीन न्यूज चाकण : चाकण जवळील मेदनकरवाडी येथील बालाजीनगरमध्ये १३ मे रोजी कामगार महिलेवर झालेल्या…

1 month ago

पहलगाम हल्ल्यानंतर कडेकोट सुरक्षेत चारधाम यात्रेला सुरुवात, केदारनाथ मंदिराचे दरवाजे उघडले

महाबुलेटीन न्यूज : Kedarnath Char Dham Yatra : पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर कडेकोट सुरक्षेत केदारनाथ…

2 months ago

This website uses cookies.