गुन्हेगारी

चोरट्या वाळू व्यवसायाच्या बीमोडासाठी वनविभागाने कंबर कसली

अज्ञातांविरुध्द वन गुन्हे दाखल

महाबुलेटीन न्यूज : शैलेश काटे
इंदापूर : उजनी पाणलोट क्षेत्रातून होणारा अवैध उपसा बंद करण्याच्या दृष्टीने पाणलोट क्षेत्राकडून कांदलगाव परिसरातील वनविभागाच्या हद्दीकडे येणारे रस्ते चारी खोदून बंद करण्याची कारवाई इंदापूर वनपरिक्षेत्र विभागाने आज (दि.५ सप्टेंबर) दुपारी केली. अज्ञातांविरुध्द वनगुन्हे दाखल केले आहेत.

या संदर्भात पत्रकारांशी बोलताना, तालुका वनपरिक्षेत्र अधिकारी राहुल काळे यांनी सांगितले की, उजनी धरण पाणलोट क्षेत्रातून अवैधरीत्या वाळू उपसा केला जातो. वाळूचा चोरटा साठा करण्यासाठी अनेकदा वनक्षेत्राचा आसरा घेतला जातो. कांदलगाव हिंगणगाव या पाणलोटाच्या शेजारी असणा-या गावांमध्ये हे प्रमाण जास्त आहे, अशी माहिती वनविभागास मिळाली होती.

पाणलोट क्षेत्राकडून वनक्षेत्राकडे येणारे रस्ते अडवले तर अवैधरित्या उपसा केलेल्या वाळूचा साठा करणे वाळूचोरांना शक्य होणार नाही, ही बाब लक्षात घेवून वनपरिक्षेत्र विभागाने आज कांदलगाव परिसरातील वनक्षेत्रात वाळू साठा शोध मोहिम सुरु केली. त्यावेळी तेथे साठवण्यात आलेली वाळू ट्रॅक्टरच्या सहाय्याने उचलून नेल्याच्या खुणा आढळल्या, असे काळे यांनी सांगितले.

वनविभागाने तात्काळ पाणलोट क्षेत्रामधून वनविभागाकडे येणा-या रस्त्यावर चा-या करुन, वाहने तिकडे येणार नाहीत याचा बंदोबस्त केला. वन हद्दीतून जाणा-या जलवाहिन्या निष्काषित केल्या. संबंधितांवर वनगुन्हे दाखल केले, असे काळे यांनी सांगितले.

कांदलगाव, हिंगणगाव परिसरातील स्थानिक लोकांचा वाळू चोरी, वाहतूक व वनहद्दीतून चोरुन जलवाहिन्या आणण्यात सहभाग असावा, असा प्राथमिक अंदाज आहे. गुन्ह्यासाठी वापरात आलेली वाहने ही याच परिसरातील असावीत. या गुन्ह्यांचा शोध घेण्याचे काम सुरु आहे. लवकरच गुन्हेगार हाती लागतील, असा विश्वास काळे यांनी व्यक्त केला.

MahaBulletin Team

Recent Posts

MahaBulletin — 22 Mar 2026

शनिवार, २१ मार्च २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 💧 गॅस…

7 hours ago

MahaBulletin — 21 Mar 2026

शनिवार, २१ मार्च २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ पुणे-नाशिक…

17 hours ago

MahaBulletin — 21 Mar 2026

शुक्रवार, २० मार्च २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 महिला…

1 day ago

MahaBulletin — 20 Mar 2026

गुरुवार, १९ मार्च २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 भीषण…

2 days ago

MahaBulletin — 19 Mar 2026

बुधवार, १८ मार्च २०२६ 📍 महाराष्ट्र आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🏛️ पुणे जिल्हा परिषद…

3 days ago

MahaBulletin — 18 Mar 2026

मंगळवार, १७ मार्च २०२६ 📍 महाराष्ट्र आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकणमध्ये भटक्या कुत्र्यांचा…

4 days ago

This website uses cookies.