प्रशासकीय

चार वर्षांपासून बंद पडलेला प्रलंबित देहू ते येलवाडी रस्त्याचा प्रश्न अखेर सुटला… ● प्रांताधिकारी व शेतकऱ्यांच्या समन्वयातून सुटला प्रश्न.. ● शेतकऱ्याच्या हस्ते नारळ फोडून प्रांताधिकाऱ्यांनी केले भूमिपूजन…

चार वर्षांपासून बंद पडलेला प्रलंबित देहू ते येलवाडी रस्त्याचा प्रश्न अखेर सुटला…
● प्रांताधिकारी व शेतकऱ्यांच्या समन्वयातून सुटला प्रश्न..
● शेतकऱ्याच्या हस्ते नारळ फोडून प्रांताधिकाऱ्यांनी केले भूमिपूजन…

महाबुलेटीन न्यूज 
देहू : चार वर्षांपासून बंद पडलेला तीर्थक्षेत्र विकास आराखड्यांतर्गत गाथा मंदिराकडे जाणारा प्रलंबित येलवाडी ते देहू रस्त्याचा प्रश्न प्रांताधिकारी व बाधित शेतकऱ्यांच्या समन्वयातून अखेर सुटला असून आज ( दि. १३ मे ) रोजी शेतकरी व प्रांताधिकाऱ्यांनी कामाचे उदघाटन केले. येत्या महिनाभरात रस्त्याचे काम पूर्ण करून गाथा मंदिर पुलावरून वाहतूक सुरळीत होणार असल्याचे खेडचे प्रांताधिकारी विक्रांत चव्हाण यांनी सांगितले. 

हा प्रलंबित १०० फुटाचा रस्ता होण्यासाठी सांगूर्डी गावचे विद्यमान सरपंच वसंतराव भसे यांनी आमदार दिलीपराव मोहिते पाटील यांच्या नेतृत्वाखाली ऑक्टोबर २०२० मध्ये उपोषण केले होते. वसंतराव भसे पाटील यांच्या उपोषणास अखेर यश आले. 

मागील चार ते पाच वर्षांपासून गाथा मंदिराकडे जाणाऱ्या पुलाजवळील रस्त्याचे काम शेतकऱ्यांनी बंद पाडले होते. खेडचे प्रांताधिकारी यांनी संबंधित शेतकऱ्यांशी समन्वय साधून चर्चा करून तांत्रिक बाबींची पूर्तता करून हा प्रश्न सोडविला. 

आज प्रांताधिकारी विक्रांत चव्हाण व बाधित शेतकरी विलास गाडे यांनी श्रीफळ फोडून रस्त्याचे भूमिपूजन करून भरावाचे कामही चालू केले. यावेळी येलवाडीच्या सरपंच हिराबाई बोत्रे, उपसरपंच वर्षा बोत्रे, माजी उपसरपंच रणजित गाडे, तंटामुक्ती अध्यक्ष जालिंदर बोत्रे, बाळासाहेब गाडे, सुदाम गाडे, नंदाराम गाडे, तानाजी गाडे, रामभाऊ गाडे, ग्रामपंचायत सदस्य तानाजी गाडे, कल्पना गाडे, उर्मिला गाडे, बाधीत शेतकरी विलास गाडे, कैलास गाडे, सुदाम विष्णू गाडे, सुधिर गाडे, प्रकाश बोत्रे, कॉंग्रेसचे उपाध्यक्ष संतोषराव बोत्रे आदी उपस्थित होते.

याबाबतची अधिक माहिती अशी की, तीर्थक्षेत्र येलवाडी ( खेड ) येथील श्री क्षेत्र देहू तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील ३० मीटर रस्त्याच्या भूसंपदनासाठी गट नं. ५३ मधील ० हेक्टर १०.७९ आर क्षेत्र खरेदी करण्याबाबत दि. १२/१०/२०२० रोजी झालेल्या जिल्हास्तरीय दर निश्चितीकरण समितीच्या बैठकीच्या वेळी रक्कम रुपये ४६ लाख ९५ हजार ५०० प्रति हेक्टरी दर प्रस्तावित करण्यात आला होता. परंतु खातेदार यांनी बैठकीच्या वेळी सदर दर बैठकीत मान्य नसल्याचे सांगून सदर प्रकरणी संपादन मंडळ तथा कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम ( दक्षिण ) यांनी सक्तीचे भूसंपादन करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी यांनी दिले होते.

दरम्यानच्या कालावधीत खातेदारांनी थेट खरेदी प्रस्तावातील त्रुटीच्या अनुषंगाने शेवटची बैठक आयोजित करणेची विनंती केली होती. त्या अनुषंगाने दि. ३०/१२/२०२० रोजी झालेल्या बैठकीत जिल्हाधिकारी पुणे यांनी खरेदी विक्री व्यवहाराच्या इंडेक्स-२ सूची व यापूर्वीचे खरेदी-विक्री व्यवहाराच्या आधारे पुनश्च मूल्यांकन टिपणीसह अहवाल सादर करणेबाबत सूचित केले होते. त्यानुसार सहाय्यक नगर रचना पुणे यांचेकडे फेर मूल्यांकन होणेबाबत प्रस्ताव पाठवून सदरच्या प्रस्तावावर संबंधित कार्यालयाकडून अभिप्राय प्राप्त होताच युक्त संपादनबाबत पुढील कार्यवाही करण्यात आली.
०००००

MahaBulletin Team

Recent Posts

MahaBulletin — 07 Sep 2026

रविवार, ६ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 कामगार…

2 days ago

MahaBulletin — 06 Sep 2026

शनिवार, ५ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…

3 days ago

MahaBulletin — 05 Sep 2026

गुरुवार, ३ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…

4 days ago

MahaBulletin — 03 Sep 2026

मंगळवार, १ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ कुकडी…

6 days ago

MahaBulletin — 01 Sep 2026

सोमवार, ३१ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 राजगुरुनगरमध्ये…

1 week ago

MahaBulletin — 31 Aug 2026

रविवार, ३० ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 अपघातांची…

1 week ago

This website uses cookies.