महाबुलेटीन न्यूज
नारायणगाव : पुणे नाशिक महामार्गावर एक बुलेट विनाचालक सुरू असलेला व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.
त्याचं झालं असं की, एक भंगार व्यावसायिक आपल्या बुलेटवरून रस्त्यावरून सुसाट निघाले, मात्र रस्त्याने पायी चाललेल्या जनार्धन दत्तू गांजवे (वय ४७, गांजवेवाडी, ता. जुन्नर) यांना या महाशयांच्या बुलेटची धडक बसली. गांजवे या धडकमुळे गंभीर जखमी झाले. मात्र बुलेटस्वार देखील बुलेटवरून खाली कोसळले. मग झाली ना पंचायत, ही बुलेट तब्बल तीनशे फूट पुढे भरधाव वेगाने गेली. यामुळे पुणे-नासिक महामार्गावर चालकाविना सुसाट वेगाने जाणारी बुलेट असा थरार पहिला मिळाला. ही घटना ९ ऑगस्ट २०२१ रोजी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास घडली. ही घटना येथील एका पेट्रोल पंपाच्या सीसीटीव्हीत कैद झाली आहे. ( ● व्हिडीओ पाहण्यासाठी आमच्या महाबुलेटीन न्यूजच्या फेसबुक पेजला भेट द्या…)
अपघातानंतर बुलेटस्वार खाली पडला, मात्र बुलेट महामार्गावरून सुमारे तीनशे फूट पुढे भरधाव वेगाने गेली. त्यानंतर ती एका मालवाहतूक जीपला आडवी जाऊन महामार्गाच्याकडेला जाऊन खाली पडली. यावेळी जीप चालकाने प्रसंगावधान दाखवून जीप थांबवली. यामुळे मोठा अपघात टळला. महामार्गावर चालकाविना सुसाट वेगाने जाणारी बुलेट असा थरार रस्त्यावरून जाणाऱ्या प्रवाशांना पाहिला मिळाला.
■ *आपल्या परिसरातील ताज्या घडामोडींसाठी आजच लाईक करा ‘महाबुलेटिन’चे फेसबुक पेज…*
————————————–
००००
महाबुलेटीन न्यूज l किशोर कराळे मुंबई, दि. ७: पुणे-नाशिक आणि नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गांवर मोठ्या प्रमाणात…
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर पुणे : हडपसर ते यवत आणि तळेगाव-चाकण शिक्रापूर महामार्गाच्या रुंदीकरणासाठी…
महाबुलेटीन न्यूज महाळुंगे ( चाकण एमआयडीसी ) : एक वर्षापासुन पाहीजे असलेल्या आरोपी कडुन १…
महाबुलेटीन न्यूज | आनंद कांबळे जुन्नर : पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील दुर्गावाडी परिसरात एक धक्कादायक…
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर चाकण ( पुणे ) : महाराष्ट्र हे उद्योगांना प्रोत्साहन देणारे…
महाबुलेटीन न्यूज | राजगुरूनगर खेड कृषी उत्पन्न बाजार समिती सेवानिवृत्त सचिव सतीश चांभारे यांची खेड…
This website uses cookies.