महाबुलेटीन न्यूज
चाकण एमआयडीसी : चाकण एमआयडीसी फेज टू मधील भांबोली (ता.खेड) येथील चाकण व वासुलीफाटा रस्त्यालगत असलेल्या दोस्ती हॉटेलच्या शेजारील हीताची कंपनीचे एटीएम अज्ञात चोरट्यांनी आज मध्यरात्री २-३० ते ३ च्या दरम्यान चोरीच्या उद्देशाने स्फोट घडवून फोडले. स्फोट होताच घाबरलेल्या चोरट्यांनी घटनास्थळावरून रक्कम जागेवर सोडून पलायन केले.
स्फोटाचा आवाज ऐकून घराबाहेर आलेल्या एका व्यक्तीने गावच्या पोलीस पाटलांमार्फत महाळूंगे पोलीस स्टेशनला खबर दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद पवार व त्यांचे पथक सकाळी घटनास्थळी दाखल झाले. बॉम्ब शोध व श्वान पथकाचीही कार्यवाही सुरु झाली आहे.
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रात्री तीनच्या सुमारास भांबोली फाट्यावरील ‘हिताची’ कंपनीचे एटीएम अज्ञात चोरट्यांनी फोडले. चोरांनी एटीएमचे शटर फोडून मुख्य मशीनला जिलेटीनचा वापर करून स्फोट जरून मशीन फोडले. किती रक्कम चोरीला गेली याची बॅंकेचा डाटा आल्यावर समजेल. मात्र घटना स्थळावर स्फोट झाल्याने दुचाकीवरून आलेल्या तीन चोरट्यांनी पलायन केल्याने काही रक्कम जागेवर पडून व काही रक्कम मशीनच्या अर्ध्या भागात सुरक्षित राहिली आहे. एटीएम रस्त्यालगतच असल्याने बघ्यांची गर्दी झाली होती. रस्त्यावरील वहातुक काही काळ विस्कळीत होऊन वाहतूक कोंडी झाली होती.
प्राथमिक माहिती नुसार, एटीएम फोडणारे तीन जण असल्याचे सीसीटीव्हीत कैद झाले आहे. एटीएम मध्ये काही नोटा पडल्याचे दिसत होते. हिताची कंपनीचे एटीएम इतरांपेक्षा अधिक सुरक्षित आणि मजबूत असते. तरीही एटीएम कसे फोडले. अशी चर्चा सुरू झाली आहे. रात्री एटीएम बंद होते. परंतु त्याला कोणी सुरक्षारक्षक नव्हता. पिंपरी-चिंचवड आयुक्तालयाच्या मार्गदर्शनाखाली म्हाळुंगे पोलीस चौकीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद पवार आणि त्यांचे पथक पुढील तपास करीत आहेत.
००००
महाबुलेटीन न्यूज l किशोर कराळे मुंबई, दि. ७: पुणे-नाशिक आणि नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गांवर मोठ्या प्रमाणात…
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर पुणे : हडपसर ते यवत आणि तळेगाव-चाकण शिक्रापूर महामार्गाच्या रुंदीकरणासाठी…
महाबुलेटीन न्यूज महाळुंगे ( चाकण एमआयडीसी ) : एक वर्षापासुन पाहीजे असलेल्या आरोपी कडुन १…
महाबुलेटीन न्यूज | आनंद कांबळे जुन्नर : पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील दुर्गावाडी परिसरात एक धक्कादायक…
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर चाकण ( पुणे ) : महाराष्ट्र हे उद्योगांना प्रोत्साहन देणारे…
महाबुलेटीन न्यूज | राजगुरूनगर खेड कृषी उत्पन्न बाजार समिती सेवानिवृत्त सचिव सतीश चांभारे यांची खेड…
This website uses cookies.