महाबुलेटीन न्यूज
चाकण : चाकण जवळील मेदनकरवाडी येथील बालाजीनगरमध्ये १३ मे रोजी कामगार महिलेवर झालेल्या बलात्कारातील आरोपीस गुन्हे शाखा युनिट तीनच्या पथकाने १२ तासात अटक केली. प्रकाश तुकाराम भांगरे ( वय २१ वर्ष रा. बालाजीनगर, मेदनकरवाडी, ता. खेड, जि. पुणे मुळ रा. अकोले, जि. अहिल्यानगर ) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी कि, चाकण पोलीस ठाणे हददीत बालाजीनगर, मेदनकरवाडी येथे फिर्यादी महिला १३ मे रोजी रात्री १०.५५ वाजता नाईट शिफ्टकरीता कंपनीमध्ये पायी जात असताना एका अनोळखी इसमाने मागुन येवुन फिर्यादी महिलेचे तोंड दाबुन व तिस ओढत शाळेचे बाजुचे रस्त्याने मोकळया जागेत घेवून गेला. तेथे फिर्यादीचे तोंड दाबुन ओरडु नको ओरडलीस तर तुला मारुन शेजारचे विहीरीत टाकीन अशी धमकी दिली. त्यावेळी फिर्यादी यांनी त्याचे हाताचा चावा घेतला, पंरतु सदर ठिकाणी अंधार असल्याने व आजुबाजुस कोणी नसल्याने जीवाचे भितीने फिर्यादी यांनी आरडा ओरड केली नाही त्यावेळी त्याने फिर्यादीस विहीरीत टाकुन दयायची धमकी देवुन तिचे इच्छेविरुध्द बलात्कार केला.
सदर बाबत चाकण पोलीस ठाणे गु.र.नं. 306/2025 भा. न्या. संहीता कलम ६९ प्रमाणे गुन्हा दाखल आहे. सदर गुन्हा गंभीर स्वरुपाचा असल्याने वरीष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सदर गुन्हयाचे समांतर तपासाचे अनुशंगाने गुन्हे शाखेकडील सर्व तपास पथकांना सुचना दिलेल्या होत्या. सदर अनोळखी आरोपीचा शोध घेण्याचा प्रयत्न करीत असताना मिळालेल्या गोपनीय बातमीच्या आधारे गुन्हे शाखा युनिट ३ चे तपास पथकाने सदर आरोपी यास शिताफिने बालाजीनगर मेदनकरवाडी येथून ताब्यात घेवून सदर गुन्हा उघडकीस आणला.
महाबुलेटीन न्यूज l किशोर कराळे मुंबई, दि. ७: पुणे-नाशिक आणि नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गांवर मोठ्या प्रमाणात…
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर पुणे : हडपसर ते यवत आणि तळेगाव-चाकण शिक्रापूर महामार्गाच्या रुंदीकरणासाठी…
महाबुलेटीन न्यूज महाळुंगे ( चाकण एमआयडीसी ) : एक वर्षापासुन पाहीजे असलेल्या आरोपी कडुन १…
महाबुलेटीन न्यूज | आनंद कांबळे जुन्नर : पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील दुर्गावाडी परिसरात एक धक्कादायक…
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर चाकण ( पुणे ) : महाराष्ट्र हे उद्योगांना प्रोत्साहन देणारे…
महाबुलेटीन न्यूज | राजगुरूनगर खेड कृषी उत्पन्न बाजार समिती सेवानिवृत्त सचिव सतीश चांभारे यांची खेड…
This website uses cookies.