सत्कार / सन्मान / पुरस्कार

चाकण फाऊंडेशनच्या वतीने महिलांचा गौरव

महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर
चाकण :
चाकण फाऊंडेशन आयोजित महिला सन्मान सोहळा इंदिरा फार्म कृषी पर्यटन केंद्र, सांडभोरवाडी ( ता. खेड ) येथे नुकताच संपन्न झाला.

चाकण फाऊंडेशन ही संस्था समाजातील वंचित, पिडित, शोषित व गरजू लोकांसाठी काम करत आहे. यंदाचे महिला सन्मान सोहळ्याचे हे सहावे वर्षे आहे. यावेळेस फाऊंडेशनने महिलांसाठी तसेच मुलांसाठी वेगवेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्यामध्ये महिलांचे गमतीचे खेळ, मुलांचे नृत्य, भाषणे आदींचा समावेश होता. यावेळी सहभागी होणाऱ्या प्रत्येक महिलेस भेटवस्तू देवून सन्मानित करण्यात आले.

या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सर्पमित्र व आदर्श शिक्षक अतुल सवाखंडे यांनी ‘सापांविषयी समज – गैरसमज ‘ या विषयावर जनजागृती केली, तर प्रविण शिंदे यांनी प्रथमोपचार कसा करावा या विषयी मोलाचे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष कवी व लेखक मनोहर मोहरे सर यांनी मुलांच्या संस्कारा विषयी आई, वडिलांची भूमिका काय असावी व महिलांच्या सन्माना विषयी मोलाचे मार्गदर्शन केले. हा कार्यक्रम शिक्षणाची जननी क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार व दिप प्रज्वलन करून सुरू करण्यात आला. यावेळी जागतिक महिला दिनाच्या अनुषंगाने सुंदर घोषवाक्य लावण्यात आली होती. शिवाजी होळकर यांनी प्रास्ताविक केले, तर कु. अथर्व कदम याने सूत्रसंचालन करून उपस्थितांचे आभार मानले.

चाकण फाऊंडेशनचे संचालक सुनिल पवार, दिलीप अहिरे, रामदास सप्रे, ज्ञानेश्वर पवार, विकास चौगुले, निवृत्ती अहिरे, सुभाष गाडगे, अविनाश कर्डीले, राजकुमार आजबे, गोरक्ष लांडे, प्रशांत पंडीत, गुलाब डोके, प्रशांत चव्हाण, योगेश भांड, सोपान वलवे, संपत कदम, अक्षय भुजबळ, शिवाजी होळकर यांनी या कार्यक्रमाचे नियोजन केले. स्नेहभोजनाने कार्यक्रमाची सांगता झाली.

MahaBulletinTeam

Recent Posts

MahaBulletin — 07 Sep 2026

रविवार, ६ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 कामगार…

3 days ago

MahaBulletin — 06 Sep 2026

शनिवार, ५ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…

4 days ago

MahaBulletin — 05 Sep 2026

गुरुवार, ३ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…

5 days ago

MahaBulletin — 03 Sep 2026

मंगळवार, १ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ कुकडी…

7 days ago

MahaBulletin — 01 Sep 2026

सोमवार, ३१ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 राजगुरुनगरमध्ये…

1 week ago

MahaBulletin — 31 Aug 2026

रविवार, ३० ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 अपघातांची…

1 week ago

This website uses cookies.