महाबुलेटीन न्यूज
चाकण : येथील तळेगाव चौकात सेलेरो कार, स्कॉर्पिओ व कंटेनर यांच्या विचित्र अपघातात सेलेरो कार मधील तीनजण जागीच ठार झाले आहेत. तर दोन जण जखमी झाले आहेत. यातील दोन तरुण सख्खे चुलत भाऊ असून वाकी बुद्रुक येथील व एकजण कडूस येथील आहे. हा अपघात सोमवार ( दि. २६ एप्रिल ) दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास झाला. वाहतूक पोलिसांनी जखमींना रुग्णवाहिकेतून त्वरित रुग्णालयात हलविले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रफुल्ल सोनवणे ( वय 27 ) अक्षय सोनवणे ( वय 23, दोघेही रा. वाकी बुद्रुक, ता.खेड, जि. पुणे ) व अविनाश रोहिदास अरगडे ( वय 28, रा. कडूस, ता. खेड, जि. पुणे ) अशी अपघातात ठार झालेल्या तरुणांची नावे आहेत. यातील अक्षय हा तळेगाव चौकातील वेदिका चाय हॉटेलचा व्यवसाय करीत होता.
शिक्रापूर बाजूकडून तळेगाव बाजूकडे जाणारा कंटेनर क्रमांक ( एम एच 04 एफ यु 0191 ) व चौकात उभ्या असलेल्या सेलेरो कार क्रमांक ( एम एच 14 ईयु 3326 ) ला भोसरी कडून राजगुरूनगरच्या बाजूला भरधाव वेगाने जाणाऱ्या स्कॉर्पिओ गाडी क्रमांक ( एम एच 14 ईपी 4321 ) ची जोरदार धडक झाली. या अपघातात चारचाकी वाहनातील तीनजण जागीच ठार झाले असून दोन जण जखमी झाले आहेत. चाकण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक पी. के. राठोड हे पुढील तपास करीत आहेत.
———–
महाबुलेटीन न्यूज l किशोर कराळे मुंबई, दि. ७: पुणे-नाशिक आणि नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गांवर मोठ्या प्रमाणात…
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर पुणे : हडपसर ते यवत आणि तळेगाव-चाकण शिक्रापूर महामार्गाच्या रुंदीकरणासाठी…
महाबुलेटीन न्यूज महाळुंगे ( चाकण एमआयडीसी ) : एक वर्षापासुन पाहीजे असलेल्या आरोपी कडुन १…
महाबुलेटीन न्यूज | आनंद कांबळे जुन्नर : पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील दुर्गावाडी परिसरात एक धक्कादायक…
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर चाकण ( पुणे ) : महाराष्ट्र हे उद्योगांना प्रोत्साहन देणारे…
महाबुलेटीन न्यूज | राजगुरूनगर खेड कृषी उत्पन्न बाजार समिती सेवानिवृत्त सचिव सतीश चांभारे यांची खेड…
This website uses cookies.