कोरोना

चाकण एमआयडीसीतील वासुली, भांबोली ‘हाय अलर्ट’ ; प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून रविवार पर्यंत कडकडीत बंद

चाकण एमआयडीसीतील वासुली, भांबोली ‘हाय अलर्ट’ ; प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून रविवार पर्यंत कडकडीत बंद

महाबुलेटीन न्यूज : दत्ता घुले
शिंदे वासुली, दि.१२ ( प्रतिनिधी ) : चाकण एमआयडीसी टप्पा दोनमधील गावांमध्ये कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. प्रामुख्याने एमआयडीसी मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या वासुली व भांबोली गावांमध्ये कोरोनाचा फैलाव मोठ्या प्रमाणावर झाल्याने पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी ही दोन गावे ‘हाय अलर्ट’ म्हणून जाहिर केली आहेत. कोरोना आटोक्यात आणण्यासाठी ‘ब्रेक द चैन’ या उपक्रमांतर्गत प्रतिबंधात्मक उपाय म्हणून स्थानिक ग्रामपंचायतींनी मंगळवार (ता.११) पासून रविवार (ता.१६) पर्यंत कडकडीत बंद पाळण्याचा निर्णय घेतला असून आजपासुन अंमलबजावणीला सुरुवात झाली आहे. 

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत एमआयडीसी प्रवण क्षेत्रातील गावांमध्ये कोरोनाचा उद्रेक होत असून रुग्ण संख्येत लक्षणीय वाढ होत आहे. या गावांमध्ये सामूहिक संसर्ग होऊन कुटूंबच्या कुटुंबे बाधीत होत आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी तालुका प्रशासनाला गाव समित्या कार्यान्वित करुन प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे आदेश दिले आहेत. तालुका स्तरीय अधिकाऱ्यांनी हाय अलर्ट व अलर्ट गावांना भेटी देऊन पहाणी करुन उपाययोजनांबाबत मार्गदर्शन करावयाच्या सुचना दिलेल्या आहेत. परंतु अद्याप तालुका प्रशासनाकडून बाधीत गावांची पहाणी केली नाही अथवा मार्गदर्शक सुचना दिल्या गेल्या नाहीत.

म्हाळुंगे पोलीस चौकीचे पोलीस निरीक्षक अरविंद पवार यांना गावबंदीचे पत्र देताना वासुली, भांबोलीचे सरपंच व पोलीस पाटील

दरम्यान वासुली व भांबोली ग्रामपंचायत व आपत्ती व्यवस्थापन समितीने ११ मे ते १६ मे पर्यंत गावबंदीचा निर्णय घेतला असून तशी माहिती खेड उपविभागिय अधिकारी विक्रांत चव्हाण व महाळूंगे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद पवार यांना माहिती सह कडकडीत बंद बाबतचे पत्र देण्यात आले. मंगळवार पासून या दोन्ही गावात, परिसरात व वासुली फाट्यावर दवाखाने व मेडीकल वगळून सर्व दुकाने बंद ठेवली असून नागरिकांना विनाकारण फिरण्यास व गावात विनाकारण प्रवेश करण्यास बंदी घालण्यात आली आहे.

 

गाव बंदीच्या पहिल्याच दिवशी नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्ती व दुकानदारांवर वासुली व भांबोली ग्रामपंचायत व आपत्ती व्यवस्थापन समितीने धडक कारवाई करत दंडात्मक कारवाई केली. भांबोली फाट्यावरील एमआयडीसीच्या मुख्य रस्त्यावर पोलीस निरीक्षक अरविंद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी व भांबोली ग्रामपंचायतीने नाकेबंदी करुन संयुक्त कारवाई केली.

संयुक्त कारवाईत वासुलीचे उपसरपंच विक्रम पाचपुते, पोलीस पाटील अमोल पाचपुते, ग्रामपंचायत सदस्य दिपक लिंभोरे, साईनाथ पाचपुते, शुभम दहातोंडे, गाव कामगार तलाठी दत्तात्रय केंगले, ग्रामसेवक श्रीधर नाईकडे, कर्मचारी सुरेश गावडे व भांबोलीचे सरपंच भरत लांडगे, शरद वाडेकर, जीवन राऊत, कर्मचारी मल्हारी माकर, अविनाश राऊत, काळूराम राऊत व मुकेश कसबे आदी उपस्थित होते.

दोन्ही गावच्या ग्रामपंचायत व आपत्ती व्यवस्थापन समितीने सर्व नागरिक, भाडेकरू, व्यावसायिकांनी बंद काळात सहकार्य करुन कोरोना आटोक्यात आणण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले असून रस्त्यावर विनामास्क, कामाशिवाय फिरणाऱ्यांवर, एकत्र येऊन गर्दी करणाऱ्यांवर व दुकाने उघडून कोरोना संसर्ग वाढीस कारणीभूत ठरणाऱ्या सर्व घटकांविरुद्ध कायदेशीर व दंडात्मक कारवाई करणार असल्याचा इशारा दिला आहे. 
——————————

    तालुक्यातील हाय अलर्ट, अलर्ट, हॉटस्पॉट असलेल्या गावांमध्ये कॉन्टॅक्ट ट्रेसींग, अॅन्टीजन टेस्टींग, गाव सर्व्हेक्षण अधिक जलद गतीने व प्रमाण वाढी आदी उपाययोजना चालू आहे. ज्या गावांमध्ये रुग्णसंख्या जास्त आहेत अशा सर्व गावांमध्ये कडक लॉकडाऊन संदर्भात लवकरच निर्णय घेतला जाईल. कोरोना हॉटस्पॉट असलेली गावे प्रामुख्याने एमआयडीसी प्रवण क्षेत्रातील गावे व ज्या ठिकाणी कंपनी कामगारांचे वास्तव्य आहेत हे जरी खरे असले तरी कंपन्यां बंद बाबतचा निर्णय सर्वस्वी वरिष्ठ पातळीवरच होऊ शकतो.
— विक्रांत चव्हाण ( खेड उपविभागिय अधिकारी )
——————————–

MahaBulletin Team

Recent Posts

MahaBulletin — 10 Jun 2026

सोमवार, ८ जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 गुन्हेगारीवर…

12 hours ago

MahaBulletin — 08 Jun 2026

रविवार, ७ जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 खेडमध्ये…

2 days ago

MahaBulletin — 17 May 2026

शनिवार, १६ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 पिंपरी…

3 weeks ago

MahaBulletin — 13 May 2026

रविवार, १० मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🐾 चाकण…

4 weeks ago

MahaBulletin — 10 May 2026

शनिवार, ९ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 वृद्धेचा…

1 month ago

MahaBulletin — 09 May 2026

शुक्रवार, ८ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🐾 बिबट्याची…

1 month ago

This website uses cookies.