महाबुलेटीन न्यूज । हनुमंत देवकर
चाकण एमआयडीसी ( दि. 21 ) : संरक्षण विभागासाठी ड्रोन, मानवविरहित नौका, आधुनिक सुरक्षा व टेहळणी उपकरणे बनवणाऱ्या सागर डिफेन्स इंजिनिअरिंग या स्टार्टअप उद्योगाच्या चाकण प्लांटचे उद्योजकता व कौशल्यविकास मंत्री नवाब मलिक यांच्या हस्ते उदघाटन संपन्न झाले.
श्री. मलिक यावेळी म्हणाले, “संरक्षण विभागासोबत काम करू इच्छिणाऱ्या उद्योगांना या क्षेत्रात चांगल्या संधी आहेत. तांत्रिक कुशल युवक, उद्योजक यांच्यामुळे संरक्षण क्षेत्रात कृत्रिम बुद्धीमत्ता (आर्टिफिशल इंटेलिजन्स), रोबोटिक्स यांचा वापर अजूनही मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. डीआरडीओ तसेच अशा स्वरूपाच्या संरक्षण विभागाच्या उपक्रमांसोबत संशोधन करून अधिक प्रभावी संरक्षण उत्पादने बनवण्यास मोठी संधी आहे. सागर डिफेन्सने या क्षेत्रात सुरुवात करून आता विस्तार करत आहे, ही अभिनंदनीय बाब आहे.”
या स्टार्टअप उद्योगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास पराशर, सह-संस्थापक मृदुल बब्बर, लक्ष्य डांग यांनी कंपनी आणि उत्पादनांविषयी माहिती मंत्री श्री. मलिक यांना दिली.
कंपनीने सुरुवातीला नौदलासोबत काम केले. कंपनीने रोबोटिक्सचा वापर करून बनवलेली मानवविरहित बोट सागरी सुरक्षा तसेच गस्तीसाठी वापरली जाते. अशीच सुरक्षा उपकरणे आता लष्कर दलासाठी बनवण्यात येत आहेत. डीआरडीओ सोबत संयुक्त संशोधन करून नौदल तसेच लष्करासाठी उपयुक्त ड्रोन तयार करण्यात येत आहेत. त्याचा उपयोग घुसखोरीवर नजर ठेवणे, गर्दीचे सनियंत्रण, शोधमोहीम तसेच रेस्क्यू ऑपरेशन, रुग्णालयांपर्यंत औषध पुरवठा आदींसाठी संरक्षण क्षेत्रात केला जात आहे.
००००
महाबुलेटीन न्यूज l किशोर कराळे मुंबई, दि. ७: पुणे-नाशिक आणि नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गांवर मोठ्या प्रमाणात…
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर पुणे : हडपसर ते यवत आणि तळेगाव-चाकण शिक्रापूर महामार्गाच्या रुंदीकरणासाठी…
महाबुलेटीन न्यूज महाळुंगे ( चाकण एमआयडीसी ) : एक वर्षापासुन पाहीजे असलेल्या आरोपी कडुन १…
महाबुलेटीन न्यूज | आनंद कांबळे जुन्नर : पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील दुर्गावाडी परिसरात एक धक्कादायक…
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर चाकण ( पुणे ) : महाराष्ट्र हे उद्योगांना प्रोत्साहन देणारे…
महाबुलेटीन न्यूज | राजगुरूनगर खेड कृषी उत्पन्न बाजार समिती सेवानिवृत्त सचिव सतीश चांभारे यांची खेड…
This website uses cookies.