महाबुलेटीन न्यूज
चाकण MIDC : चाकण एमआयडीसीतील म्हाळुंगे गावच्या हद्दीतील कंपनीत पाण्याचा टँकर पुरवण्याच्या वादातून सहा हल्लेखोरांनी एका व्यावसायिक तरुणावर कोयत्याने वार करून निर्घृण खून केल्याची घटना घडली आहे. या घटनेचा प्रकार सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाला आहे. आरोपी फरार झाले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना शुक्रवारी ( दि. १४ मे ) रोजी सायंकाळी पावणे पाच वाजण्याच्या सुमारास म्हाळुंगे ( ता. खेड ) येथील रेणुका हॉटेल समोर घडली. या हल्ल्यात अतुल तानाजी भोसले ( वय २६, रा. भोसले वस्ती, म्हाळुंगे, ता. खेड, जि. पुणे ) हा तरुण गंभीर जखमी झाला होता. त्याच्यावर चाकण येथील युनिकेअर हॉस्पिटलमध्ये प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी बिर्ला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असताना आज ( दि. १५ मे ) रोजी त्याने पहाटेच्या सुमारास अखेरचा श्वास घेतला. त्याचा मित्र अक्षय पंडित बोऱ्हाडे ( वय २६, रा. म्हाळुंगे ) याने काल हल्ला झाल्यानंतर म्हाळुंगे पोलीस चौकीत फिर्याद दिली आहे. अतुल भोसले व आरोपी अक्षय शिवळे यांच्यात कंपनीला पाण्याचे टँकर पुरवण्यावरून फोनवरून बाचाबाची झाली होती. त्यामुळे आरोपींनी चिडून जाऊन हे कृत्य केले.
याप्रकरणी आरोपी अक्षय अशोक शिवळे, गणेश ढरमाळे, गोट्या भालेराव ( सर्व रा. म्हाळुंगे, ता.खेड, जि.पुणे ) व तीन अज्ञात आरोपींवर रात्री उशिरा खुनी हल्ला केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनंतर आरोपींनी पलायन केले आहे.
पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपायुक्त मंचक इप्पर, सहाय्यक पोलीस आयुक्त प्रेरणा कट्टे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश यमगर, पोलीस उपनिरीक्षक महेश चिट्टपल्ले, पोलीस पाटील सचिन भोपे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश यमगर, गुन्हे शाखेचे पोलीस हवालदार योगेश आढारी, पो.ह. बाळसराफ, पो.ह. हणमंते यांचे पथक पुढील तपास करीत आहेत.
अतुल हा आई वडिलांना एकुलता एक मुलगा होता. त्यांच्यामागे आई, पत्नी, लहान मुलगा, बहीण असा परिवार आहे.
महाबुलेटीन न्यूज l किशोर कराळे मुंबई, दि. ७: पुणे-नाशिक आणि नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गांवर मोठ्या प्रमाणात…
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर पुणे : हडपसर ते यवत आणि तळेगाव-चाकण शिक्रापूर महामार्गाच्या रुंदीकरणासाठी…
महाबुलेटीन न्यूज महाळुंगे ( चाकण एमआयडीसी ) : एक वर्षापासुन पाहीजे असलेल्या आरोपी कडुन १…
महाबुलेटीन न्यूज | आनंद कांबळे जुन्नर : पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील दुर्गावाडी परिसरात एक धक्कादायक…
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर चाकण ( पुणे ) : महाराष्ट्र हे उद्योगांना प्रोत्साहन देणारे…
महाबुलेटीन न्यूज | राजगुरूनगर खेड कृषी उत्पन्न बाजार समिती सेवानिवृत्त सचिव सतीश चांभारे यांची खेड…
This website uses cookies.